Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
  • Goods Transport Services of MSRTC" For more information pl. contact :- 022-23024068
  • किल्ले रायगड दर्शन.... आता एसटीने....ते ही, माफक दरात..!
  • For Technical Assistance ,Please Call 022-23053992
  • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Call-Centre No. 1800221250

ETIM, GPS and Other Points

महिला वाहक

महामंडळांच्या सेवेत महिला वाहकांच्याही नेमणूका करण्यात आल्या आहेत.

इलेक्ट्रॉनिक तिकिट इश्यू मशीनः

प्रवाशांना तिकिटे देण्यात सुलभता यावी या दृष्टीकोनातून इलेक्ट्रॉनिक तिकिट इश्यू मशीन वापरण्यास सुरुंवात केली असून सर्वच म्हणजे 249 आगारातील वाहक या मशीनव्दारे तिकिटे देत आहेत. सदर मशीनमुळें प्रवाशांना तिकिट देणे सुलभ झाले असून वाहकांना त्यामुळें हिशोब करणे सुलभ झाले असून प्रवाशांना देखील योग्य तिकिट मिळाले आहे किंवा कसे याची खात्री करुन घेणे शक्य झाले आहे. तसेच प्रशासनास निर्णय घेण्याचे दृष्टीने तात्काळं माहिती उपलब्ध होत आहे.

विनाशुल्क दुरध्वनी सेवा केंद्र :

रा.प. महामंडळांच्या विविध सेवांची, उपक्रमांची माहिती प्रवाशांना विनाशुल्क मिळंण्याच्या हेतूने मध्यवर्ती कार्यालयात टोल फ्रि क्रमांक 1800 22 1250 वर विनाशुल्क सेवा केंद्र (टोल फ्रि सुविधा, कॉल सेंटर) दिनांक 10.02.2010 पासून कार्यरत करण्यात आले आहे.

स्मार्ट कार्ड :

आवडेल तेथे प्रवास योजने अंतर्गत 4 आणि 7 दिवसांचा पास, विद्यार्थी मासिक पास, अहिल्याबाई होळकर योजना पास तसेच मासिक व त्रैमासिक पास योजना, यांसाठी हस्तलिखित पास देण्या ऐवजी आरएफआयडी स्मार्ट कार्ड योजनेची अंमलबजावणी करण्यात आली आहे. सदर योजना दिनांक 25.2.2014 पासून टप्प्या-टप्प्याने सुरुं करण्यात आली असून सध्या रा.प.महामंडळांच्या 245 आगारांतून राबविण्यात आली आहे. उर्वरित आगारांत लवकरच योजना राबविण्याचे प्रस्तावित आहे. सदर योजनेनुसार 'पी' टाईप आरएफआयडी स्मार्टकार्ड 9,80,000 व 'टी' टाईप आरएफआयडी स्मार्टकार्ड 2,90,000 चे वितरण करण्यात आलेले आहे.
आगाऊ तिकीट आरक्षणाच्या परताव्याच्या दरांमध्ये बदल करण्याबाबत व आगाऊ तिकीट आरक्षण धारक प्रवाशांना प्रवास तारीख बदल संधी देण्याबाबत (अंमलबजावणी दि. 1/4/2008 पासुन)

प्रवास सुखसोयी व सुविधा

प्रवाशांना जास्तीत जास्त प्रवास सुखकर करण्याचे एकमेव ध्येय असून त्यासाठी खालील प्रवासी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत

आगार - २४९

बसस्थानके - ५९७

मार्गस्थ निवारे - ४१५०

उपहारगृहे व चहाची दुकाने - १११९

पुस्तकांची दुकाने - २४७

इतर वाणिज्य आस्थापना -१४२६

ब) सुलभ व्यवस्था: '' सुलभ इंटरनॅशनल '' या संस्थेद्वारे रा. प. बसस्थानकावरील स्वच्छता गृहांची देखभाल केली जाते. अशा प्रकारची सुलभ स्वच्छता गृहांची व्यवस्था महाराष्ट्रात ३०० ठिकाणी करण्याचे महामंडळाचे उद्दिष्ट आहे. महामंडळात १२६ निरनिराळया ठिकाणी सुलभ स्वच्छता गृहांची सोय करण्यात आली आहे.
क) थंड पाण्याची सोय प्रवाशांना स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध व्हावे म्हणून राज्यातील एवूत्र्ण ८८ रा. प. बसस्थानकांवर आतापर्यंत वॉटर वुत्र्लर्स बसविण्यात आलेले आहेत व त्यात आणखी वाढ करण्याच्या दृष्टीने कार्यवाही चालू आहे.
ड) फलाट तिकिट योजना दिनांक १/१/१९९६ पासून मुंबई सेंट्रल येथील बसस्थानकावर फलाट प्रवेश तिकिट योजना चालू करण्यात आली आहे. ज्यांना बसस्थानकात जावयाचे आहे. अंशा व्यक्तीना एक रुपयाचे फलाट तिकिट घ्यावे लागेल, परंतु ज्यांचेकडे आरक्षण तिकिट आहे, अशा प्रवाशांना व १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना हे तिकिट घ्यावे लागत नाही़.