Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
  • Goods Transport Services of MSRTC" For more information pl. contact :- 022-23024068
  • किल्ले रायगड दर्शन.... आता एसटीने....ते ही, माफक दरात..!
  • For Technical Assistance ,Please Call 022-23053992
  • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Call-Centre No. 1800221250

Citizens Charter

नागरिकांची सनद

रस्ते प्रवासी वाहतूक या व्यवसायाचे नागरिक जीवनमानाशी असलेले अतूट नाते लक्षात घेवून,राष्ट्राचा /नागरिकांचा सर्वांगीण उत्कर्ष या हेतूने केंद्र शासनाने रस्ते परिवहन महामंडळ कायदा १९५० पारीत करुन,रस्ते प्रवासी वाहतूक व्यवसायाकरीता प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र रस्ते प्रवासी वाहतूक महामंडळ कार्यान्वित करण्याची तरतूद केलेली आहे़. त्यास अंनुसरुन राज्यातील नागरिकांकरीता सूसुत्र,किफायतशीर,गतीमान व कार्यक्षम रस्ते प्रवासी वाहतूक सेवेचे जाळे निर्माण व्हावे याकरीता महाराष्ट्र शासनाने,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची निर्मिती केलेली आहे़. राज्याच्या आर्थिक सामाजिक विकासाकरीता प्रवाशी वाहतूकीचे महत्व विचारात घेवून राज्य शासनाने राज्यातील रस्ते प्रवाशी वाहतुकीबाबत पुरोगामी / विकसनशील धोरणात्मक निर्णय घेवून सन १९७४ मध्ये राज्यातील रस्ते प्रवाशी वाहतुकीची राष्ट्रीयकरणाची योजना पूर्ण करुन राज्यातील रस्ते टप्पा प्रवासी वाहतुकीचे एकाधिकार एसटी महामंडळास प्रदान केलेले आहेत़. परिणामी, महामंडळाकडून प्रवाशांकरिता उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सोयी सुविधा व सेवा यांची माहिती जनतेस मिळावी हा नागरिकांचा मुलभूत हक्क आहे,तरी महामंडळांच्या कार्याबाबतची माहिती जनतेस मिळावी या हेतूने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ''नागरिकांची सनद'' प्रकशित केलेली आहे़ यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अधिक कार्यक्षम,गतीमान,ग्राहकाभिमुख व पारदर्शक होण्यास मदत होईल़ कार्यक्षम वाहतुक सुविधा निर्माण व्हावी याकरिता मध्यवर्ती कार्यालय,३१विभागीय कार्यालये, ३ मध्यवर्ती कार्यशाळा ,२५० आगारे,३ प्राशिक्षण केंद्र, ९ टायर पुनःस्तरीकरण केंद्र,५६८ बसस्थानके,३६३९ प्रवाशी निवारे व सुमारे १०४००० कर्मचारीवर्ग अशी अवाढव्य यंत्रणा निर्माण केलेली आहे़ महाराष्ट्र शासनाने राज्यातील नागरिकांना कार्यक्षम दळण-वळण सुविधा निर्माण व्हावी याकरिता,''गांव तेथे रस्ता'',हे धोरण अंगिकारलेले आहे़ या धोरणास पूरक ''रस्ते तेथे एस़ टी़ '' अंसे धोरण महामंडळाने अंगिकारलेले आहे़. त्याचप्रमाणे महामंडळाने ''बहुजन हिताय व बहुजन सुखाय'' व प्रवाशांच्या सेवेसाठी यास अनुसरुन रस्ते प्रवासी वाहतुक सुविधा नागरिकांसाठी पुरविलेली आहे़. महाराष्ट्र शासनाचे प्रवाशी वाहतुक विषयक धोरण व त्यास अंनुसरुन महामंडळाने निर्माण केलेले प्रवासी वाहतुकीचे जाळे याचा हातभार राज्याच्या सर्वांगीण विकासावर झालेला असून,राज्याच्या विकासात राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा मौलिक वाटा आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळासंबंधी माहिती़

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळावर एक अध्यक्ष व कमाल १७ संचालक नेमण्याची  तरतूद आहे़ यामध्ये महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, ९ आसकीय संचालक, ३ केंद्र आणि 2 राज्य शासनाचे प्रतिनिधी व २ कामगार प्रतिनिधीचा समावेश असतो़ वर्तमान संचालक मंडळावर अध्यक्ष (अशासकीय) व ५ शासकीय संचालकांची नेमणूक  करण्यात आली आहे

 
 

संचालक मंडळ

 

अध्यक्ष, परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य
श्री.शेखर चन्ने (भा.प्र.से.) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
श्री.आशिष कुमार सिंह (भा.प्र.से.) शासकीय संचालक,प्रधान सचिव, परिवहन व बंदरे,गृह विभाग, महाराष्ट्र शासन, मंत्रालय,मुंबई - ४०००३२
डॉ.महेंद्र कल्याणकर (भा.प्र.से.) शासकीय संचालक, कामगार आयुक्त, महाराष्ट्रा राज्य,कामगार भवन, भूखंड क्रमांक सी.-२० ब्लॉक नंबर ई बांद्रा (पूर्व) मुंबई -४०००५१.
श्री. परेश कुमार गोएल (भा.सं.से.) शासकीय संचालक,संचालक (परिवहन) ,ट्रान्सपोर्ट भवन,१ पार्लीमेंट स्ट्रीट,
नवी दिल्ली -११०००१
श्रीमती.इति पांडे (भा.रे.वा.से.) शासकीय संचालक मुख्य वाणिज्य प्रबंधक (पी. एस.) मध्य रेल्वे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई - ४००००१.
श्री.शेखर चन्ने (भा.प्र.से.)
 
शासकीय संचालक, परिवहन आयुक्त, परिवहन आयुक्तांचे कार्यालय, प्रशासकीय भवन, ३/४ था मजला, सरकारी वसाहत, बांद्रा (पूर्व) मुंबई -४०००५१.

महामंडळ संचालक मंडळाच्या सभा साधारणतः तीन महिन्यातून एकदा किवा आवश्यकतेनुसार होतात़. मार्ग परिवहन महामंडळ अधिनियम १९५० च्या कलम - २२ अंन्वये अभिप्रेत अंसल्यानुसार महामंडळ आपल्या उपक्रमांचा व्यवहार व्यावसायिक तत्वावर करते़