Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
  • Goods Transport Services of MSRTC" For more information pl. contact :- 022-23024068
  • किल्ले रायगड दर्शन.... आता एसटीने....ते ही, माफक दरात..!
  • For Technical Assistance ,Please Call 022-23053992
  • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Call-Centre No. 1800221250

Stores and Purchase - Page 2


(इ).  महामंडळामध्ये होणा-या विविध वस्तूंच्या खरेदीच्या स्त्रोतांची विभागणी खालील प्रमाणे आहेः-


अ) खरेदीची टक्केवारी :-

अ) पुरवठादारांकडून खरेदी/ एकूण खरेदाशी टक्केवारी (अंदाजित)
१. सरकारी उपक्रम आणि सार्वजनिक उपक्रम ८४%
२. राज्य मार्ग परिवहन संघटना पुरवठा व विल्हेवाट  महासंचालक १%
३. खुली निविदा १५%
४. एकूण १००%

ब) खरेदीच्या स्रोताची टक्केवारी

ब)-१ उत्पादकांकडून खरेदी (डिझेलसह) एकूण खरेदाशी टक्केवारी (अंदाजित)
१. महाराष्ट्रामधून ९०%
२. महाराष्ट्रा बाहेरून १०%
३. एकूण १००%

ब)-२ उत्पादकांकडून खरेदी (डीझेल वगळून) एकूण खरेदाशी टक्केवारी (अंदाजित)
१. महाराष्ट्रामधून ७९.५%
२. महाराष्ट्रा बाहेरून २०.५%
४. एकूण १००%

(फ) इतर माहितीः-

(१) भांडार सामान व यंत्रसामुग्रीच्या खरेदीचे विकेंद्रीकरण व वितरण व्यवस्था़

महामंडळाच्या कार्य क्षेत्राची व्याप्ती व प्रवाशी वाहतुकीसाठी गाडयांची नियोजन बध्द चालन व्यवस्था, विभाग व आगारांची संख्या, गाडयांची संख्या इ. विचारात घेता सर्व विभागांना व त्यांचे मार्फत आगारांना वेळेवर आवश्यक भांडार वस्तूंचा पुरवठा होण्याच्या दृष्टीकोनातून वस्तू खरेदीचे विकेंद्रीकरण करण्याचा महामंडळाने धोरणात्मक निर्णय घेतला व त्या प्रमाणे विविध भांडार वस्तू खरेदीचे विकेंद्रीकरणाची पध्दत अमलात आणली़ मध्यवर्ती कार्यालयाने निश्चित केलेल्या दर करारास अधिन राहून त्या त्या विभागांच्या व मध्यवर्ती कार्यशाळांच्या आवश्यकते प्रमाणे भांडार वस्तू थेट खरेदीचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत़ सदर विकेंद्रीकरण योजनेमुळे सुटया भागांची उपलब्धता वाढलेली असून सुटया भागांच्या अभावी नादुरुस्त राहणा-या गाडयांच्या प्रमाणात लक्षणीय घट झालेली आहे, हे गेलया पाच वर्षाच्या माहितीवरुन स्पष्ट होते़

(२) अप्रचलीत / अचल वस्तुंची विल्हेवाट
-

महामंडळ ठराव क़ ९५ दि़ ३० जुलै १९८४ आणि महामंडळ ठराव क़ २६३ दि़ ८ मार्च १९८५ अन्वये निर्देशित केलेल्या पध्दती प्रमाणे ज्या वस्तुंचा खप महामंडळ पातळीवर सलग १२ महिने व १२ महिन्यापेक्षा जास्त झालेला नाही अशा अप्रचलीत वस्तुंची विल्हेवाट लिलावाद्वारे केली जाते
या व्यतिरिक्त ज्या वस्तुच्या खप ०६ माहिन्यांच्या कालावधीत झालेला नाही अशा वस्तुंची संपूर्ण यादी सर्व विभाग व मध्यवर्ती कार्याळांना पाठविली जाते जेणे करुन आ वस्तुंचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा़ गेल्या पाच वर्षातील वर्षे अखेरीस आ वस्तुंच्या साठया बाबतची माहिती खालील प्रमाणे आहे


महामंडळ पातळीवर
वर्षे

अचल वस्तू साठा (रु. लाखांत)

एकूण वस्तू साठ्याची टक्केवारी
३१.०३.२०१२                    ६४.७६ १.४५
३१.०३.२०१३                    ७१.५७ ०.८९
३१.०३.२०१४                      ६३.११ १.१५

(३)स्थानिक पातळीवरील खरेदीचे अधिकार

महामंडळाच्या विविध स्तरांवर खरेदी करण्यात येणा-या वस्तू या मध्यवती कार्यालयाने निविदांद्वारे निश्चित केलेलया वार्षिक / व्दैवार्षिक दरकराराप्रमाणे असतात़ ज्या वस्तुंचे दरकरार काही कालावधीसाठी उपलब्ध नसतील व ज्या वस्तूंचे दैनंदिन उत्पादन व चालन सुरळीत राखण्यासाठी तांतडीची गरज असेल तर आगार, विभाग, मध्यवर्ती कार्यशाळा अशा विविध स्तरांवर स्थानिक खरेदीची कार्यप्रणाली व आर्थिक मर्यादा ठरवून देऊन मर्यादित निविदा मागवून तातडीच्या स्थानिक खरेदीचे अधिकारही देण्यात आलेले आहेत़ भांडार व खरेदी खात्याकडून नियमित दरकरार उपलब्ध ठेवून स्थानिक खरेदी नियंत्रीत करण्याचे प्रयत्न केले जातात.

  (४) गुणवत्ता नियंत्रण:-

दर करारांनुसार पुरवठादारांकडून पुरवठा होणा-या भांडार वस्तूंच्या गुणवत्तेची तपासणी यंत्र आभयांत्रिकी खात्या मार्फत केली जाते़ प्राप्त पुरवठयातून ऐच्छीक नमूने काढून त्यांची शासन मान्यताप्राप्त प्रयोगशाळे मार्फत सातत्याने गुणवत्ता तपासणी केली जाते़ एखादया वस्तुची गुणवत्ता कमी आढळल्यास त्याबाबत संबंधीत स्त्रोतांवर पुरवठा केलेल्या वस्तूच्या किंंमतीवर दंड आकारणी केली जाते़ तसेच पुरवठयामध्ये सातत्य नसेल व दर्जेदार उत्पादन मिळत नसेल तर अशा पुरवठादारांकडून पुढील होणारी खरेदी रोखली जावून त्यांना भविष्यात दर कराराप्रमाणे धंदा न देण्याची कृतीही महामंडळाकडून केली जाते़

(५) वस्तुसूची नियंत्रण :-

महामंडळाच्या विविध विभाग व मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये होणा-या वस्तूखरेदीच्या वस्तुसूचीवर व साठयावर नियंत्रण रहावे व आतरिक्त व अप्रचलित साठा होवू नये तसेच मागणी प्रमाणे पुरवठा कमी पडू नये या साठी वस्तुनिहाय खपाच्या मुल्यावर आधारित अ ब क अशी वस्तूंची गटश्रेणी करुन भांडार साठयाच्या वेगवेगळया पातळया निश्चित केलेल्या आहेत़

मार्च २०१४ मध्ये महामंडळामध्ये एकुण भांडार साठा रु़. ५५.२१ कोटी आहे. महामंडळाच्या विविध विभाग व

मध्यवती कार्यालयांमधिल भांडार साठयाची एकूण स्थिती खालील प्रमाणे आहे़


वर्ष (मार्च अखेर) स्वयंचल वस्तू (रु. कोटीत) सर्व साधारण वस्तू (रु. कोटीत) एकूण (रु. कोटीत)
२०११-२०१२ ०९.९९ ३५.०४ ४५.०९
२०१२-२०१३ ११.५३ ४१.१३ ५२.६६
२०१३-२०१४ १५.७८ ३९.४३८ ५५.२१

(६) पुरवठादारांवरील दावे व ते निकालीकाढण्या संबंधी कार्यप्रणालीः-

दरकरार कालावधी मध्ये जरपुरवठादारांचे गुणवत्ता अथवा पुरवठया संबंधीचे कार्यपालन असमाधानकारक आढळून आल्यास अशा पुरवठा दारांकडून वस्तू तपासणी फी वसुल केली जाते़ तसेच त्यास दंड आकारला जातो. प्रसंगी खरेदी पण थांबविली जाते दाव्याच्या रक्कमेची वसुली थेट संपर्क साधून, पुढील पुरवठयाच्या देयकातून वा त्यांचे सुरक्षा ठेव रक्कमेतुन वसुल करण्यात येते तसेच वसुलीसाठी रा.मा.प. ऊ संस्थेची मदत घेण्यात येते़ काही प्रसंगी न्यायालयीन कारवाई केली जाते़

(७) भंगार सामानाची विल्हेवाट :-

महामंडळाच्या बसगाडयांची दुरुस्ती, देखभाल ,निकामी टायर्स, तसेच नविन बस बांधणी व विविध उत्पादन प्रकिंयेतून विविध वस्तूंच्या भंगार सामानाची निर्मिती होते़ तसेच विहीत-आयुर्मर्यादे नंतर वाहन तापत्यातील बस गाडया मोडीत काढल्या जातात़ अशा सर्व भंगार सामुग्रीची विक्री करण्यासाठी महामंडळाने ई-ऑक्शन द्वारे विक्री करण्यासाठी महामंडळ ठराव क्र. २००९:०८:१२ दिनांक १०.०८.२००९ नुसार मंजूरी दिली असून खालील तीन लिलावकरकर्त्यांची नेमणूक करुन त्यांचे बरोबर दरकरार करण्यात आले होते. सदर दरकराराची मुदत तीन वर्ष व पुढे दोन वर्ष वाढ करण्याच्या अटीसह होती.  सद्य स्थितीत सदर दरकरार दिनांक ०९.११.२०१४ रोजी संपुष्टात आलेले असून नवीन लिलाव् कर्त्याची निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.
१.  मे सायनाईज टेक्नॉलॉजीज, पुणे दरकरार क्र. १४५/२००९-१२
२.  मे़ किसनरामचंद्र ऑक्शनिअर्स प्रा़ली़ पुणे दरकराक क्र.२२८/२००९-१२
३.  मे़ंकररामचंद्र ऑक्शनिअर्स प्रा़ली़ पुणे दरकराक क्र.२२७/२००९-१२ सर्व साधारण पणे एका आर्थिक वर्षात प्रत्येक विभागात २ ते ३ लिलावांचे आयोजन केले जाते. भंगार सामान व बसेसच्या विक्रीतून मागील पाच वर्षात महामंडळाला खालील प्रमाणे एकूण उत्पन्न मिळाले आहे.


वर्ष भंगार विर्कीचे एकूण मूल्य (रु. लाखांत)
२०११-२०१२                 ६७०५.७६
२०१२-२०१३                  ७६३४.२२
२०१३-२०१४                  ८६२३.८६

पुढील नियोजन :-

अ) संपुर्ण भांडार शाखेचे संगणकीकरण करण्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर खरेदी साठी निविदा मागवीणेबाबत :- संपुर्ण भांडार शाखेच्या व्यवहारासंबंधीचे संगणकीकरण करण्या साठी आवश्यक सॉफ्टवेअर खरेदी साठीचा प्रस्ताव महामंडळाने मान्य केला असून या साठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट यांनी आऱएफ़पी़ तयार केले असून ते प्रसिध्द  करून निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
.
ब) ई-टेंडर पध्दती :- महामंडळात संगणकीय कार्यप्रणालीचा वापर करण्याच्या दृष्टीकोनातून ई-टेंडरींग पध्दती अवलंबण्याचा निर्णय घेतला़. महाराष्ट्र सरकारने या बाबत धोरणात्मक निर्णय घेऊन मे. सीफी नेक्स्ट टेंडरर यांचेशी ई-टेंडरींग बाबत दरकरार केलेला आहे. या दरकराराच्या आधारे महामंडळात सुद्धा ई-टेंडरींग निविदा मे़ सीफी नेक्स्ट टेंडरर यांचे मार्फत महामंडळात ई-टेंडरींग पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे़.


थोडक्यात या खात्याचे मुख्य स्वरुप इतर शाखांना सेवा पुरवणे हेच आहे़ वाहनासाठी लागणारे नट-बोल्ट पासून ते टायर-टयूब पर्यत, तसेच यंत्रसामुग्री, कर्मचा-यांना दैनंदिन कामकाजात लागणारे साहित्य ते गणवेषाच्या कापडापर्यंत सर्व साधन सामुग्री पुरवण्याचे महत्वाचे कार्य या शाखेमार्फत करण्यात येते़


 


<<Page 1                     Page 2