Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
 • Goods Transport Services of MSRTC" For more information pl. contact :- 022-23024068
 • किल्ले रायगड दर्शन.... आता एसटीने....ते ही, माफक दरात..!
 • For Technical Assistance ,Please Call 022-23053992
 • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Call-Centre No. 1800221250

Computerized and Internet Advance Booking Facility

संगणकीय व इंटरनेट व्दारे आरक्षण सुविधा :

प्रवासी जनतेच्या सेवेसाठी रा.प. महामंडळांने स्वतःचे ३२२ ठिकाणी संगणकीय आरक्षण सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. त्याशिवाय विविध शहरात एकूण २१२ खाजगी संगणकीय आरक्षण केंद्रे कार्यान्वित करण्यास परवाने देण्यात आलेले आहे. दिनांक ०८.०१.२०१० पासून रा.प. महामंडळांतर्फे प्रवाशांना इंटरनेट व्दारे आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळें प्रवाशांना घर बसल्या संगणकावरुंन व इंटरनेट सुविधा असलेल्या भ्रमणध्वनीव्दारे  रा.प.बसेसचे आरक्षण सुविधा उपलब्ध झालेली आहे. सदर सुविधा msrtc.maharashtra.gov.in अथवा www.msrtcors.com या संकेत स्थळांवर उपलब्ध होऊ शकेल. तसेच इंटरनेटव्दारे मे.अ‍ॅटम टेकनॉलॉजिज्‌ कंपनीच्या माध्यमाने एसएमएसव्दारे तिकिट आरक्षण सुविधा उपलब्ध झालेली आहे.

प्रवाशांना अधिक लाभ मिळण्याच्या दृष्टीने तिकिट रद्द करण्याची सुविधा पुर्वीच्या दोन दिवसाच्या मुदतीवरुंन फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेंच्या चार तास अगोदर पर्यंत दिनांक २४.१२.२०१२ पासून उपलब्ध केली आहे. सामान्य स्थायी आदेश क्र १२००, दिनांक १०/०३/२००८ (वाहतूक खात्यामार्फत प्रसारीत) आगाऊ तिकीट आरक्षणाच्या परताव्याच्या दरांमध्ये बदल करण्याबाबत व आगाऊ तिकीट आरक्षण धारक प्रवाशांना प्रवास तारीख बदल संधी देण्याबाबत (अंमलबजावणी दि़ ०१/०४/२००८ पासून) (सामान्य स्थायी आदेश क्र १०२८, दिनांक ०३/१२/१९७९, सामान्य स्थायी आदेश क्र १०९९, दिनांक ०५/०८/१९८५, महामंडळ ठराव क्र. २००७:१२:१०, दिनांक १९/१२/२००७) रा. प. महामंडळाने विविध कारणांस्तव प्रवाशांनी प्रवास रद्द वेत्र्ल्यास प्रवाशांना प्रवासभाडे रक्कमेचा परतावा देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. सामान्य स्थायी आदेश क्र. १०२८, दिनांक ०३/१२/१९७९ मध्ये पव्रासी रक्कमेच्या परताव्याची टक्केवारी व परतावा देण्याची कार्यपध्दती विस्तृतपणे नमूद केलेली आहे. सामान्य स्थायी आदेश क्र. १०९९, दिनांक ०५/०८/१९८५ मध्ये निमआराम, आराम तसेच वातानुकूलीत बसेसच्या प्रवासाचा परतावा कशा पध्दतीने यावा, याबाबत सविस्तर नमूद केलेले आहे. महामंडळ ठराव क्र. २००७:१२:१०, दिनांक १९/१२/२००७ अन्वये सामान्य स्थायी आदेश क्र. १०२८, दिनांक ०३/१२/१९७९ मधील कलम ०३. ०१ मधील (१) ते (७) या व कलम ३. २ मधील (१) व (२) मधील तिकीट रद्द करण्यासाठी ५० पैसे व रु़ १/- या तरतुदी रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सामान्य स्थायी आदेश क्र. १०९९, दिनांक ०५/०८/१९८५ मधील परताव्यासंबंधी सर्व तरतुदी रद्द करण्यात आल्या आहेत. महामंडळ ठराव क्रमांक २००७:१२:१०, दिनांक १९/१२/२००७ अन्वये सर्व प्रकारच्या बससेवांसाठी पूर्ण पैसे भरुन आगाऊ आरक्षण वेत्र्लेले तिकीट रद्द करावयाचे असल्यास सामान्य स्थायी आदेश क्र १०२८ मधील कलम ३. १ मध्ये खालीलप्रमाणे तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.

 

कलम 3. 1
 1. गाडी सुटण्याचे नियोजित वेळेच्या ४ तास अगोदर तिकीट रद्द करण्यासाठी अर्ज केला असेल तर फक्त आरक्षण आकाराची कपात करुन संपूर्ण प्रवास भाडयाची रक्कम प्रवाशास परत करण्यात यावी़
 2. गाडी सुटण्याचे नियोजित वेळेच्या अर्ध्या तासापर्यंत तिकीट रद्द करण्यासाठी अर्ज वेत्र्ला तर प्रवासभाडयाच्या १० टक्के कपात करण्यात यावी़ (उदा़ सकाळी ११. ०० वाजता सुटणा-या गाडीस १०. ३० वाजेपर्यत)
 3. गाडी सुटण्याचे नियोजित वेळेच्या ३० मिनिटापुर्वी व प्रत्यक्ष गाडी सुटल्यानंतर २ तासापर्यंत तिकीट रद्द करण्यासाठी अर्ज केला तर प्रवासभाडयाच्या ५० टक्के कपात करण्यात येऊन परतावा देण्यात यावा़ ( उदा़. सकाळी ११. ०० वाजता सुटणा-या गाडीस १०. ३० पासून ते ११. ०० वाजेपर्यंत ( या अर्ध्या तासाच्या कालावधीत ) व गाडी सुटल्यानंतर ०१. ०० वाजेपर्यंत )
 4. तिकीट रद्द करण्यासाठी कोणताही आकार  लावण्यात येऊ नये़ (पुर्वी जो कलम ३. २ मधील (१) व (२) तरतुदीप्रमाणे ०. ५० पैसे व रु़ १. ०० लावण्यात येत होता़ )

पुसट खराब झालेल्या, फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या आगाऊ आरक्षण तिकीटावर परतावा मिळणार नाही़ वरील परताव्याचे दर सर्व प्रकारच्या बस सेवा प्रकारांना लागू राहतील. तसेच परताव्याच्या रकमेची आकारणी नजिकच्या रुपयात करण्यात यावी़ सामान्य स्थायी आदेश क्रमांक १०२८, दिनांक ०३/१२/१९७९ मधील परताव्या संदर्भातील इतर तरतुदीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही़ इतर तरतुदी पुर्वीप्रमाणेच लागू राहतील.


दिनांक १०.०६.२०१७ पासून सामान्य स्थायी आदेश क्रमांक १२०० दिनांक १०.०३.२००८ कलम क्रमांक ३.१ मध्ये पुढील प्रमाणे बदल करण्यात येत आहे.

1.        बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या २४ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द केल्यास १० टक्के प्रवास भाडे वसूल करून + आरक्षण आकार कपात करण्यात येईल.

2.        बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या १२ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द केल्यास २५ टक्के प्रवास भाडे वसूल करून + आरक्षण आकार कपात करण्यात येईल.

3.        बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ०४ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द केल्यास ५० टक्के प्रवास भाडे वसूल करून + आरक्षण आकार कपात करण्यात येईल.

4.        बस फेरी सुटण्याच्या नियोजित वेळेच्या ०४ तास अगोदर पर्यंत तिकीट रद्द करता येईल सदर कालावधी नंतर आरक्षित तिकीट रद्द करता येणार नाही.

5.        तिकीट रद्द करण्याकरिता कोणताही आकार ( रद्दीकरण आकार )घेण्यात येणार नाही.( पूर्वी जो कलम ३.२ मधील (i) तरतुदी प्रमाणे ०.५० पैसे व रु.१.०० आकारण्यात येत होता)

6.        पुसट,खराब झालेल्या,फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या आगाऊ आरक्षण तिकिटावर परतावा मिळणार नाही.

          टीप : नियोजित सुटण्याची वेळ म्हणजे मूळ ठिकाणा पासून ( बस स्थानक ) सुटण्याची वेळ.


3-अ) प्रवास तारीख बदल संधी : सामान्य स्थायी आदेश क्रमांक १०२८, दिनांक ०३/१२/१९७९ अन्वये रा. प. महामंडळाने प्रवाशांनी विविध कारणास्तव प्रवास रद्द वेत्र्ल्यास प्रवास रद्द झाल्यास प्रवाशांना प्रवासभाडे रक्कमेचा परतावा देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. परंतु सदर सामान्य स्थायी आदेशामध्ये प्रवाशांना जर काही कारणास्तव तिकीट आरक्षणाच्या तारखे अगोदर व नंतर प्रवास करावयाचा असल्यास, तशा प्रकारच्या संधीची तरतूद नाही़ सदर संधी उपलब्ध नसल्याने प्रवासी तिकीट रद्द करणे पसंत करतात व ऐनवेळी सोय म्हणून अवैध वाहनातून प्रवास करतात. त्यामुळे अवैध वाहतूकीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होते़ त्यामुळे प्रवाशांस प्रवास तारखेमध्ये बदल करण्याची संधी दिल्यास प्रवाशी महामंडळाकडे आणखी आकर्षित होतील, यासाठी महामंडळ ठराव क्र. २००७:१२:१०, दिनांक १९/१२/२००७ अन्वये ठराव पारीत करुन आगाऊ तिकीट आरक्षण धारक प्रवाशांना प्रवास तारीख बदल संधी देण्यास मान्यता दिलेली आहे.

 

अ) प्रवास तारीख बदल संधीची वैशिष्टे खालीलप्रमाणे :

 1. एखाद्या प्रवाशाला आगाऊ आरक्षण केलेल्या तारखेला प्रवास करावयाचा नसल्यास त्यास आरक्षण तारखेच्या अगोदरच्या तारखेस अथवा नंतरच्या तारखेस प्रवास करावयाचा असेल तर त्यास प्रत्यक्ष बस सुटण्याच्या वेळेच्या चार तास अगोदर संबंधित स्थानकप्रमुखांना भेटून बदल करता येईल. सदर संधी प्रवाशांस विनामुल्य देण्यात येईल.
 2. अशा वेळी संबंधित स्थानक प्रमुख प्रवाशाने अपेक्षित केलेल्या तारखेस बसमध्ये जागा उपलब्ध असल्यास त्याप्रमाणे प्रवाशास नवीन तिकीट देतील व जुने जमा करुन घेतील. नवीन तिकीटावर स्थानक प्रमुख ' प्रवास बदल संधी तिकीट ' असे नमूद करतील व त्याप्रमाणे सोबत दिलेल्या परिशिष्ट  अ' मध्ये स्वतःकडे रजिस्टर ठेऊन त्यामध्ये आवश्यक त्या नोंदी करुन घेतील.
 3. प्रवाशाने बदल करुन मागणी केलेल्या तारखेला गाडीमध्ये जागा नसेल व प्रवाशास उभे राहून प्रवास करण्याची इच्छा अंसल्यास त्यास त्यासाठी कोणतेही आसन आरक्षित न करता प्रवास करण्याची स्थानक प्रमुख परवानगी देतील. याप्रकरणी प्रवाशास आरक्षण आकार परत मिळणार नाही़
 4. जर एखाद्या प्रवाशाकडे साध्या गाडीचे तिकीट असेल व त्याने मागणी केलेल्या तारखेला साध्या गाडीत सीट उपलब्ध नसेल व इतर प्रकारच्या बसेसमध्ये उदा़ निम आराम, आराम, इत्यादी बसमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध अंसेल व प्रवासी त्या बसमध्ये प्रवास करु इच्छित असेल, तर त्या प्रवाशाकडून भाडयामधील फरकाची रक्कम वसूल करुन स्थानक प्रमुख त्या प्रवाशास प्रवास करु देण्याची सवलत देतील व तशा सविस्तर नोंदी परिशिष्ट 'अ' मधील रजिस्टरमध्ये करतील.
 5. एखाद्या प्रवाशाकडे निम आराम,आराम  इत्यादी बसेसचे तिकीट असेल व त्यास आरक्षण तारखेच्या अगोदर अथवा नंतर प्रवास करावयाचा असल्यास व त्याच प्रकारच्या बसमध्ये सीट उपलब्ध नसल्यास इतर प्रकारच्या बसमध्ये सीट उपलब्ध असल्यास, उदा़ साधी बस, तो प्रवाशी साध्या गाडीमधून प्रवास करावयास तयार अंसल्यास त्यास स्थानकप्रमुख त्या प्रवाशाला प्रवासभाडयामधील फरकाची रक्कम परत करुन सवलत देतील व तशा नोंदी परिशिष्ट ' अ' मधील रजिस्टरमध्ये ठेवतील.

संगणकीय तिकीट असेल तर संगणकीय प्रणालीत स्थानकप्रमुख संबंधितांकडून सदर बदलाची नोंद करुन घेतील व तशी स्वतंत्रपणे नोंद ठेवतील.

अ) प्रवास तारीख बदल संधीच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे :

 1. प्रवास तारीख बदल संधी घेणा-या प्रवाशाने स्थानकप्रमुखाकडे लेखी स्वरुपात अर्ज करणे आवश्यक राहील.
 2. प्रवास तारीख बदल संधी ही प्रवाशांस विनामूल्य देण्यात येईल.
 3. सदर संधी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसना लागू राहील.
 4. सदर संधी महामंडळाने आगाऊ आरक्षणासाठी वेळोवेळी विहीत केलेल्या मुदतीत घेता येईल. ( उदा़ आगाऊ आरक्षणाची मुदत सध्या ३० दिवस आहे. या मुदती नंतरच्या तारखेस प्रवासी सदर संधी घेऊ इच्छित असेल तर ती मिळणार नाही़ )
 5. सदर संधी ही एकच वेळ वापरता येईल.
 6. सदर संधी बस सुटण्याच्या ठिकाणाहूनच मिळेल.
 7. सदर संधी घेतल्यामुळे साध्या गाडीच्या प्रवाशाला निम आराम अथवा उच्च श्रेणीच्या बसमध्ये प्रवास करणे भाग पडत असेल, तर साध्या गाडीच्या व उच्च श्रेणी गाडीच्या प्रवासभाडयातील फरकाचा परतावा नियमाप्रमाणे प्रवाशास देण्यात येईल.
 8. सदर संधी घेतल्यामुळे निम आराम अथवा उच्च श्रेणीच्या बसच्या प्रवाशास साध्या गाडीतून प्रवास करणे भाग पडत असेल, तर साध्या गाडीच्या व उच्च श्रेणी गाडीच्या प्रवासभाडयातील फरकाचा परतावा नियमाप्रमाणे प्रवाशास देण्यात येईल.
 9. प्रवाशांच्या संख्येमध्ये प्रवाशांस बदल करता येईल व त्याप्रमाणे त्याच्याकडून प्रवासभाडयाचा फरक वसूल करण्यात येईल. मात्र प्रौढा बद्दल मुल व मुलाबद्दल प्रौढ असा बदल करता येणार नाही़
 10. सदर संधी घेतल्यामुळे Partial or full Cancellation नियमानुसार करता येईल.
 11. प्रवाशांस गतव्य स्थान बदलता येणार नाही़
 12. सदर संधी घेणारा प्रवासी सिट नसल्यामुळे उभ्याने प्रवास करण्यास तयार अंसल्यास त्याला आरक्षण आकार परत मिळणार नाही़
 13. प्रवास तारीख बदल संधीच्या बाबतीत स्थानक प्रमुख प्रवाशाला नविन तिकीट देतील. त्यावर स्थानक प्रमुख ' प्रवास बदल संधी तिकीट ' असा उल्लेख करतील. वाहक गाडीमध्ये मार्गपत्रकावर  सदर तिकीटाच्या सर्व नोंदी घेतील.
 14. एखाद्या प्रवाशास जर दुस-या विभागाच्या गाडीत प्रवास बदल संधी दिली असल्यास ज्या आगाराचे मुळ तिकीट आहे त्याच्या विभागाने दुस-या विभागात उत्पन्न वर्ग करुन देण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती महिना अखेर कळवून उत्पन्न वळते करुन घ्यावे.

प्रवास बदल संधी तिकीट रद्द करावयाचे असल्यास महामंडळाच्या नियमाप्रमाणे परतावा दिला जाईल.
अ) इतर सूचना :

 1. प्रवास तारीख बदल संधीच्या बाबतीत स्थानक प्रमुख प्रवाशाला नवीन तिकीट देतील. त्यावर स्थानक प्रमुख ' प्रवास बदल संधी तिकीट ' अंसा उल्लेख करतील. वाहक गाडीमध्ये मार्गापात्राकावर  सदर तिकीटाच्या सर्व नोंदी घेतील.
 2. आागर व्यवस्थापकांनी परिशिष्ट ' अ मध्ये दिलेल्या नमुन्यात रजिस्टर ठेवावे़
 3. आगार लेखाकार व स्थानक प्रमुखांनी परिशिष्ट ' अ मध्ये ठेवलेले रजिस्टर रोजच्या रोज तपासणी करावयाची आहे.

वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी याबाबत लेखा खात्याचे विस्तृत परिपत्रक  प्रसारीत करतील. परिशिष्ट ' अ' प्रवास तारीख बदल संधी घेतलेल्या प्रवाशांचे विवरण पत्र आगार : तारीख :

भाग-1-प्रवास तारीख बदल संधी मागणी करणा-या प्रवाशाच्या जुन्या तिकीटाची माहिती

 1. प्रवाशाचे नांव
 2. प्रवासाची तारीख
 3. प्रवासाचा मार्ग
 4. गाडी सुटण्याची वेळ
 5. सेवाप्रकार
 6. आसन क्रमांक
 7. आगाऊ आरक्षण तिकीट क्रमांक
 8. आगाऊ आरक्षणाची तारीख
 9. आगाऊ आरक्षण तारखेची वेळ
 10. आगाऊ आरक्षणाची रक्कम
 11. प्रौढांची संख्या
 12. मुलांची संख्या
भाग-2-प्रवास तारीख संधी तिकीटाची माहिती
 1. प्रवास तारीख बदल संधी मागणी केलेल्या अर्जाची तारीख व वेळ
 2. प्रवास तारीख बदलुन मागितलेली नवीन तारीख
 3. नवीन प्रवासाचा सेवाप्रकार
 4. नवीन प्रवासाची गाडी सुटण्याची वेळ
 5. नवीन प्रवासाची आसनसंख्या
 6. प्रौढांची संख्या
 7. मुलांची संख्या
 8. प्रवास बदल संधी तिकीटाचा क्रमांक
 9. प्रवासभाडयाची रक्कम
 10. प्रवासभाडे रक्कम
 11. तिकीट अंशतः  केलेले असल्यास व्यक्तीची संख्या (प्रौढ+मुले)
 12. अशतः रद्द केलेल्या तिकीटाची रक्कम (रु़ )
 13. नवीन सेवाप्रकारामुळे प्रवासीभाडयाच्या रकमेचा फरक वसुल वेत्र्ला असल्यास फरकाची रक्कम (रु़ )
 14. नवीन सेवाप्रकारामुळे प्रवाशास परतावा दिला असल्यास परताव्याची रक्कम (रु़ )
प्रवासी उभ्याने प्रवास करीत होत काय ? आगार लेखाकार स्थानकप्रमुख आगार व्यवस्थापक प्रादेशिक व्यवस्थापकांनी खालील नमुन्यात विभागनिहाय विवरणपत्र महाव्यवस्थापक यांना दर महिन्याच्या १० तारखेपर्र्यंत पाठवावे़
प्रवास बदल संधी तिकीट घेतलेल्या प्रवाशांमुळे महामंडळास मिळालेले उत्पन्न (रु़ ) ( सदर सामान्य स्थायी आदेशाची अंमलबजावणी दि़ ०१/०४/२००८ पासून करण्यात यावी़ )