Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
  • Goods Transport Services of MSRTC" For more information pl. contact :- 022-23024068
  • किल्ले रायगड दर्शन.... आता एसटीने....ते ही, माफक दरात..!
  • For Technical Assistance ,Please Call 022-23053992
  • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Call-Centre No. 1800221250

Safety Campaign

सुरक्षितता मोहीम

राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता परिषद , भारत सरकार या परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार मोटर वाहन अपघात सुरक्षिततेची जाणिव सर्व स्तरावर होण्यासाठी संपुर्ण देशभर दरवर्षी जानेवारी महिन्यात सुरक्षितता मोहीम राबविण्यात येते़. या विषयाबाबत केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या आदेशांनुसार संपुर्ण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात जानेवारी 2014 या कालावधीत मार्ग सुरक्षितता मोहीम साजरी करण्यात आली़. यावर्षीच्या मोहीमेत खालील दर्शविलेले निरनिराळे कार्यकम आयोजित करण्यात आले होते.

मोहीमेचा उद्देश

प्रवाशांमध्ये सुरक्षित प्रवासाबद्द्‌ल विश्वास वृध्दींगत करणे, सर्व राज्य परिवहन कर्मचा-यांच्या मनामध्ये सुरक्षित वाहतुकीच्या जबाबदारीची जाणीव निर्माण करणे, सुरक्षित वाहतुकीसाठी घालून दिलेल्या कार्यपध्दती पाळण्यावर भर देणे तसेच राज्य परिवहन वाहनांना अंपघात होणार नाहीत या बाबत सदैव काळजी घेणे़

मोहीमेत सहभागी होणारे मान्यवर / आधिकारी / कर्मचारी

1. मा़ अध्यक्ष, म़ रा़ मा़ प़ महामंडळ

2. मा़ उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, म़ रा़ मा़ प़ महामंडळ

3. सर्व मा. संचालक, म़ रा़ मा़ प़ महामंडळ

4. सर्व खाते / शाखा प्रमुख

5. सर्व स्तरावरील आधिकारी ( मध्यवर्ती , प्रदेश, विभाग व आगार कार्यालय )

6. सर्व स्तरावरील पर्यवेक्षक

7. सर्व चालक / वाहक

8. सर्व यांत्रिकी व देखभाल कर्मचारी प्रचार कालावधी व प्रचाराची दिशा

प्रचार कालावधी व सुरक्षितता मोहीम या कालावधीत वाहनांमधील दोष व वाहन चालविण्यामधील दोष या मुद्यांवर विशेष लक्ष पुरविण्यात आले़. जानेवारी 2014 या कालावधीत सुरक्षितता मोहीम साजरी करण्यात आली़. सुरक्षितता मोहीमेचे रोजी मान्यवर जसे पोलिस आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा पोलिस आधिक्षक, पोलिस आधिक्षक, उप जिल्हाधिकारी, उप पोलिस आधिक्षक, तहसीलदार, प्रादेशिक परिवहन आधिकारी, जिल्हा परिवहन आधिकारी, वैद्यकिय अधिकारी, नामांकित शाळा - कॉलेजचे प्राध्यापक / अध्यापक, स्थानिक समाज कार्यकर्ते, रोटरी, लायन्स, जेसीस या सारख्या सामाजिक कार्य करणार्‍या संस्थाचे पदाधिकारी / सभासद व यासारखे इतर मान्यवर यांचे हस्ते प्रत्येक आगारात उद्‌घाटन करण्यात आले़.

मार्ग देखरेख

राज्यातील राष्ट्रीय / राज्य महामार्ग व तसेच इतर रस्त्यावर मार्ग देखरेख कार्यक्रम राबविण्यात आला़. या देखरेख कार्यक्रमात आधिकारी व पर्यवेक्षकीय कर्मचारी यांचा समावेश होता़. या कार्यक्रमांमध्ये चालकांच्या वाहन चालविण्याच्या सवयींवर विशेष लक्ष देण्यात आले़. तसेच आतिवेगाने वाहन चालविणे, चुकीच्या पध्दतीने पुढील वाहनास ओलांडून जाणे, अरुंद पुलावरुन समोरुन वाहन येत असेल तर राज्य परिवहन वाहन पुलावर नेणे, अनधिवृत्र्त थांब्यावर बस थांबविणे या प्रवृत्ती पासून चालकांना परावृत्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले़ राज्यातील निरनिराळया मार्गावर तात्पुरती तपासणी केंद्रे उभारण्यात आली होती़.

कर्मचार्‍यांच्या बैठका

प्रचार मोहीम कालावधीत तसेच सुरक्षितता मोहीम कालावधीत कर्मचा-यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या़. या बैठकांमध्ये सर्व कर्मचा-यांच्या मनावर सुरक्षितपणे प्रवाशांची वाहतूक व बचावात्मक पध्दतीने वाहन चालविण्याचे महत्व बिंबविण्यात आले़ वेग मर्यादा न पाळल्यामुळे, वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे व योग्य पध्दतीने वाहन न चालविल्यामुळे होणा-या नुकसानीबाबत कर्मचा-यांना माहिती देऊन सतर्क करण्यात आले़ अपघाताकडे कल असलेल्या चालकांवर विशेष लक्ष देण्यात आले़ सुरक्षितता मोहीम कालावधीत अपघात व सुरक्षितता उपाययोजनेची आवश्यकता या विषयावर राज्य परिवहन कर्मचा-यांसाठी भाषण / प्रबोधन करण्यासाठी समाजातील निरनिराळया स्तरावरील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते़ अशा प्रकारची पाच भाषणे प्रत्येक आगारात सुरक्षितता मोहीम कालावधीत आयोजित करण्यात आली़.

सुरक्षितता मोहीमेची प्रसिध्दी

सुरक्षितता मोहीमेची प्रसिध्दी होण्यासाठी प्रत्येक आगारात सुरक्षितता मोहीमेचे 10 पूत्र्ट x 2 पूत्र्ट आकाराचे बॅनर्स दर्शनी भागी प्रदर्शित करण्यात आले़. सुरक्षितता मोहीमेचे बिल्ले सर्व कर्मचा-यांना वाटण्यात आले़ सुरक्षितता मोहीमेची प्रसिध्दी वर्तमान पत्रातूनही देण्यात आली़. सुरक्षितता मोहीमेची भिंतीपत्रके व निवडक सुरक्षितता घोषणांचे कागदी स्टिकर्स्‌ चालक / वाहक यांच्या विश्रांतीगृहात, नियंत्रण कक्षात, बसस्थानकांवर, विभागीय व आगार कार्यशाळेत आणी इतर महत्वांच्या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आली. मा़. अध्यक्ष , मा़. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे चालकांसाठी आवाहन पत्रक तयार करण्यात आले होते़ या आवाहन पत्रकाची प्रत प्रत्येक चालकास देण्यात आली़. चालकांसाठी सुरक्षितपणे वाहन चालविण्याबाबत सुचनांची पुस्तिका पुन्हा तयार करुन त्याची प्रत प्रत्येक चालकास देण्यात आली़.

इतर कार्यक्रम

महामंडळाच्या काही आगारांमध्ये सुरक्षितपणे वाहन चालविण्या विषयीचे बोधपट चालकांना दाखविण्यात आले कार्यशाळेमधून बाहेर पडणारी वाहने पुर्णतः मार्गावर धावण्याच्या निर्दोष स्थितीत असल्याबाबत यंत्र आभियांत्रिकी कर्मचा-यांनी खात्री वेत्र्ली़. राज्य परिवहन चालकाने वाहनात असलेले दोष निदर्शनास आणले असता, या दोषांचे पुर्णपणे निराकरण करण्यात आल्यानंतरच वाहन मार्गावर पाठविण्यात आले़ सुरक्षितता मोहीम कालावधीत ज्या चालकांना प्रशिक्षणासाठी बोलविण्यात आले, त्या चालकांना अपघाताचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात येऊन कोणत्या चुकीमुळे अपघात होतात, त्या चुका निदर्शनास आणून देण्यात आल्या़ काही सेवाभावी संस्थांनी चालकांसाठी दृष्टीतिक्ष्णता तपासणी शिबीरे आयोजित वेत्र्ली होती़ या शिबीरांमध्ये राज्य परिवहन चालक / कर्मचार्‍यांना पाठवून दृष्टीतिक्ष्णता तपासणी करुन घेण्यात आली़. चालक, वाहक व इतर कर्मचारी यांच्यामध्ये अपघात सुरक्षितता जबाबदारीचे वातावरण निर्माण करण्यासाठी सुरक्षितता मोहीमेचा विशेष आराखडा तयार करुन त्यानुसार कार्यक्रम सर्वस्तरावर राबविण्यात आले़.

सन 1995 - रस्ता सुरक्षा वर्ष भारत सरकारच्या आदेशान्वये सन 1995 वर्ष हे ' रस्ता सुरक्षा ' वर्ष म्हणून साजरे करण्यात आले होते़ यासाठी चालकांचे उजळणी प्रशिक्षण, चालकांची दृष्टी तिक्ष्णतेची तपासणी, मार्ग देखरेख, मान्यवरांची भाषणे, भिंतीपत्रके प्रदर्शित करणे इत्यादि कार्यक्रम सर्व विभागांमध्ये आयोजित करण्यात आले होते़ आगारात काम करणा-या कर्मचा-यांना व चालकांना कार्यक्षमतेच्या दृष्टीने प्रोत्साहन मिळावे म्हणून सलग 6 महिन्याच्या अपघात विरहीत कालावधीसाठी आगाराच्या कामगिरीबद्दल ₹ 2,500/- चे पारितोषिक देण्याची योजना कार्यान्वित आहे.

2. जे चालक सतत 260 दिवस विना अपघात सेवा एक वर्षाच्या कालावधीत पुर्ण करतील अशा चालकांना ₹ 1000/- चे पारितोषिक तर जे चालक सतत 260 दिवस विना अपघात सेवा एक वर्षापेक्षा जास्त परंतू दोन वर्षाच्या आत पूर्ण करतील अंशा चालकांना ₹ 600/- चे पारितोषिक देण्याची योजना कार्यान्वित आहे.

  1. चालकांना निवड श्रेणी देतांना अपघात विरहीत 5 वर्षाचा काळ असणे ही एक अट ठेवली आहे.
  2. ज्या चालकांनी 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे आणि 30 वर्षे अशी अपघात विरहीत सेवा वेत्र्ली असेल अशा चालकांना सुरक्षित वाहन चालविण्या बद्दलचा बिल्ला देण्यात येतो़
रस्ते वाहतूक सुरक्षितता करंडक देशातील निरनिराळ्या राज्यातील राज्यमार्ग परिवहन महामंडळे, कंपन्या, शहरी वाहतूक करणारे उपक्रम, शासकिय खाते यांची राष्ट्रीय पातळीवर संघटना ( ए.एस.आर.टी़ यु़ ) नवी दिल्ली येथे आहे. या संघटनेत एवूत्र्ण 70 सभासद आहेत. प्रवासी वाहतूक क्षेत्रात निरनिराळाश चांगल्या कामकाजाबाबत सभासद उपक्रमांना ही संघटना दरवर्षी बक्षिसे / करंडक प्रदान करते़ म. रा. मा. प. महामंडळाचे अपघातांचे दर लाख कि़ मी़ मागे प्रमाण सन 1992-93 साली कमीत कमी अंसल्याने या वर्षाचा '' रस्ते वाहतूक सुरक्षितता करंडक '' म. रा. मा. प. महामंडळाला मिळाला होता़ दिनांक 30. 03. 1994 रोजी श्री़ सी़ एन. रामदास , भा. प्र. से , अध्यक्ष, राज्य मार्ग परिवहन उपक्रम संघटना तथा सचिव, भूतल परिवहन मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या हस्ते '' रस्ते वाहतूक सुरक्षितता करंडक '' म. रा. मा. प. महामंडळास प्रदान करण्यात आला. म. रा. मा. प. महामंडळात 20 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे अपघात विरहित सेवा करणार्‍या 720 चालकांचा  रोजी विशेष समारंभ आयोजित करुन मा़ उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. अपघात विरहित सेवा करणार्‍या चालकांचा विशेष गौरव करण्याबाबात महामंडळ संचालकांनी निर्णय घेतला होता़ त्यानुसार चालकांचा विशेष गौरव समारंभ तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला़ या सत्कार समारंभास मा. अध्यक्ष, मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक , मा. संचालक, म. रा. मा. प. महामंडळ, आधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता़ या विशेष गौरव समारंभाच्या ठळक बाबी पुढील प्रमाणेः

 अ) 30 वर्षे विंत्र्वा त्यापेक्षा जास्त वर्षे अपघात विरहित सेवा झाली, अशा एवूत्र्ण 75 चालकांचा मा़. अध्यक्ष, म रा मा प महामंडळ यांचे हस्ते रोख ₹ 15,000/- चे बक्षिस, सन्मानपत्र व या चालकांच्या धर्मपत्नीचा साडी-खण देऊन गौरव करण्यात आला़

ब) 25 वर्षा पेक्षा जास्त परन्तु 30 वर्षाच्या आत अपघात विरहित सेवा झाली, अशा एवूत्र्ण 394 चालकांचा मा़ अध्यक्ष, मरामाप महामंडळ यांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला़