Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
  • Goods Transport Services of MSRTC" For more information pl. contact :- 022-23024068
  • किल्ले रायगड दर्शन.... आता एसटीने....ते ही, माफक दरात..!
  • For Technical Assistance ,Please Call 022-23053992
  • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Call-Centre No. 1800221250

Travel safety and accident prevention measures

अपघात प्रतिबंधक उपाय योजना व प्रवास सुरक्षितता

1. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे़

2. दोन वाहनांमध्ये सुरक्ष्रित अंतर न ठेवल्यामुळे़

3. योग्य तो अंदाज न घेतल्यामुळे़

4. चुकीच्या पध्दतीने पुढील वाहनाला ओलांडून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे़

5. यांत्रिकी दोषामुळे़

6 वाहन पाठीमागे घेताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे़

7. योग्य तो इशारा न दिल्यामुळे़

8. योग्य ती सावधगिरी न घेतल्यामुळे़

9. मद्यपान करुन वाहन चालविल्यामुळे़

10. दुसर्‍या वाहन चालकाच्या चुकीमुळे़

11. प्रवाशाने चालत्या गाडीत चढण्याचा / उतरण्याचा प्रयत्न केल्यामुळे़

12. सायकलस्वाराच्या चुकीमुळे़

13. पादचार्‍याच्या चुकीमुळे़

14. प्रवाशाच्या चुकीमुळे़ राज्य परिवहन बसेसना होणारे अपघात टाळण्याच्या उद्देशाने महामंडळाने जे अनेकविध प्रतिबंधक उपाय योजिले आहेत त्यांची माहिती पुढीलप्रमाणेः

1. चालकांच्या जागेसाठी निवड करतांना त्यांच्या किमान दर्जा संबंधी नियम केले असून, त्याचे कटाक्षाने पालन वेत्र्ले जाते़.

2. चालकांना उतारु वाहन चालविण्यास देण्यापुर्वी आठ आठवड्याचे अभिक्रम प्रशिक्षण देण्यात येते़.

3. चालकांना प्रशिक्षण देणारे वाहतूक निरिक्षक (प्रशिक्षण) त्यांच्या कामात वाकबगार आहेत. मध्यवर्ती कार्यालयाने तयार केलेल्या सुरक्षित वाहतुकीबाबतची नियमावली विषद करुन सांगण्याचे व प्रात्यक्षिक करुन दाखविण्याचे काम हे वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण) करतात. चालकांच्या अखत्यारीत असलेली दुरुस्ती कशी करावी हे चालकांना समजावून सांगण्यात येते त्यांना याबाबत तांत्रिक शिक्षण देण्यात येते व त्यांची चाचणीही घेण्यात येते़.

4. वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण ) यांना प्रशिक्षण देण्याबाबत महामंडळाच्या मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेत वेळोवेळी कार्यक्रम हाती घेण्यात येतात. चालकांना प्रशिक्षण देण्याचे काम ज्यांच्याकडे सोपवावयाचे त्या वाहतूक निरिक्षकांची निवड करतांना त्यांचे वय, स्वाभाविक कल, अनुभव या गोष्टी विचारात घेण्यात येतात.

5. चालक प्रशिक्षणासाठी एका वेळी 15 चालकांच्या तुकडीला प्रशिक्षण देण्यात येते़

6. महामंडळाच्या चालकांना ज्या प्रकारच्या वाहनांवर काम करावे लागेल, त्या प्रकारच्या वाहनांवर प्रशिक्षण देण्यात येते़

7. सुरक्षित व उत्तम त-हेने गाडी चालविण्याविषयीचे बोधपट चालकांना वेळोवेळी दाखविण्यात येतात.

8. सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध विषयांवर विस्तृत सुचना देण्यात आलेल्या आहेत.

9. प्रवाशांची सुरक्षितता वृध्दिंगत होण्यासाठी आणि अपघातास प्रतिबंध या दृष्टीने सुरक्षितता मोहीमा ठराविक कालावधीत आयोजित वेत्र्ल्या जातात. जानेवारी 2014 या कालावधीत सुरक्षितता मोहीमेचे आयोजन करण्यात आले.

10. महामंडळाने चालकांसाठी सुरक्षितपणे वाहन चालविण्याबाबत सुचनांची पुस्तिका तयार करत्र्न त्याची प्रत प्रत्येक चालकास देण्यात आली आहे.

11. चालकांच्या वाहन चालविण्याच्या सवयीवर वाहतूक पर्यवेक्षकीय कर्मचा-यांनी / अधिका-यांनी लक्ष ठेवण्याबाबत सुचना कार्यान्वित आहेत.

12. अपघात निरिक्षण नियमावली करण्यात आलेली आहे. सर्व अपघातांची चौकशी केली जाते व त्यातील निष्कर्षानुसार अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खबरदारीचे उपाय योजण्यात येतात.

13. अपघात प्रतिबंध कार्यवाहीसाठी सर्व अपघातांचे वर्गीकरण करुन नोंद घेण्यात येते़

14. चालकांच्या नियुक्तीच्या तारखेपासून वयाची 40 वर्षे होईपर्यत प्रत्येक 2 वर्षाचा कालावधी संपल्यावर दृष्टीतिक्ष्णतेची तपासणी आणि 40 वर्षापेक्षा अधिक वय झालेल्या चालकांची प्रत्येक वर्षी दृष्टीतिक्ष्णतेची तपासणी करण्यात येते़

15. चालकाने गाडी तपासून ताब्यात घेतांना काही दोष आढळून आल्यास ते संपूर्ण दुरुस्त झाल्याखेरीज गाडी मार्गावर पाठविण्यात येत नाही़ आगारातून गाडी बाहेर पडण्यापुर्वी व परतल्यावर काही दोष असल्यास ते दुरुस्त करुन घेण्याच्या दृष्टीने गाडी तपासण्याची पध्दत अनुसरली जाते़

16. मार्गावरील गाडीची स्थिती समाधानकारक असावी तसेच वाहतुकीच्या नियमांचे कसोशीने पालन होते किंवा नाही हे पाहण्यात येते़

17. वेळापत्रके अशा रितीने तयार वेत्र्ली आहेत की, कोणत्याही चालकाला कधीही वेग मर्यादेपेक्षा अधिक व जलद वेगाने गाडी चालविण्याची जरुरी नाही़ रस्त्याची परिस्थिती, वाहतुकीचे प्रमाण यावरुन दोन ठिकाणांमधील अंतर कापण्याची वेळ ठरविली जाते़

18. दैनिक व दशदिन वाहन देखभाली व्यतिरिक्त राज्य परिवहन गाडाशंची देखभाल आगार व विभागीय कार्यशाळेत खालील नियतांप्रमाणे करण्यात येते़

(अ) पहिले डॉकिंग आगार कार्यशाळा - 2 महिने पूर्ण झाल्यावऱ

(ब) दुसरे डॉकिंग आगार कार्यशाळा - 4 महिने पूर्ण झाल्यावर .

(क) तिसरे डॉकिंग विभागीय कार्यशाळा 6 महिने पूर्ण झाल्यावऱ

(ड) चौथे डॉकिंग आगार कार्यशाळा - 8 महिने पूर्ण झाल्यावऱ

(प) पाचवे डॉकिंग आगार कार्यशाळा - 10 महिने पूर्ण झाल्यावऱ

(फ) आर. टी. ओ. पासींग विभागीय कार्यशाळा - 1 वर्ष पूर्ण झाल्यावऱ 19. बसेसच्या देखभालीचा कार्यक्रम वेळेवर अमलात आणण्याकडे विशेष कटाक्ष आहे. देखभालीचा दर्जा सुधारण्याकडे लक्ष देण्यात येते़

20. सुरक्षिततेसाठी वाहनाची देखभाल कशाप्रकारे करावी यावर विशेष भर देण्यात येतो़

21. बसस्थानकावरील सर्व वाहतूक कर्मचाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत की, कामावर असलेला वा कामावर रुजू होणारा चालक मद्यपान केलेला किंवा अंमली पदार्थाचे सेवन वेत्र्लेले नाही याची खात्री करुन नंतरच त्यास गाडी चालवू द्यावी़ चालकाने मद्यपान केलेले आढळल्यास वाहकास गाडी थांबविण्याबद्दल सुचना आहेत. कामागीरीवरील चालक मद्यपान वेत्र्लेला अंथवा अंमली पदार्थाचे सेवन वेत्र्लेला आढळल्यास असे कृत्य गैरवर्तणुकीच्या सदरात अंतर्भूत केले जाते व सक्त शिक्षा म्हणून कामावरुन कमी करण्यापर्यंत शिक्षा करण्याची तरतुद करण्यात आली आहे.

22. कामावर हजर असतांना चालक नशेत आढळल्यास त्यास त्वरित कामगिरीवरुन उतरवून आगार व्यवस्थापक किंवा सुरक्षा व दक्षता अधिकारी यांच्या ताब्यात पुढील कार्यवाहीसाठी देण्यात येते़

23. सर्व आगारांमध्ये आणि सर्व सुरक्षा व दक्षता अधिका-यांना चालकाची अल्कोहोल टेस्ट घेण्यासाठी खास उपकरणे पुरविण्यात आली आहेत. चालकांची अल्कोहोल टेस्ट शासकीय दवाखान्यात घेण्याबाबतही सुचना कार्यान्वित आहेत.
 

24. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग व तसेच इतर हमरस्त्यावर देखरेख करण्याविषयी सुचना कार्यान्वित आहेत. मार्ग देखरेख कार्यक्रमात प्रत्येक अधिका-याचा समावेश असतो ही देखरेख वेगवेगळाश मार्गावर निरनिराळ्या अधिकार्यांव्दारे करण्यात येते़.

25. प्रादेशिक व विभागीय कचेरीतील अधिकारी ज्या वेळेस आगारात तपासणी भेटी देतात त्या वेळी चालक, वाहक व इतर कर्मचारी यांच्या बैठका आयोजित करण्यात येतात. या बैठकीमध्ये महामंडळाने अपघात सुरक्षिततेविषयी जे नियम केले आहेत त्यांची चर्चा करण्यात येते, जेणे करुन सर्व कर्मचा-यांच्या मनामध्ये सुरक्षिततेचे महत्व बिंबविले जाते़.

26. चालक, वाहक व बस स्थानक प्रमुख यांना अशा सुचना दिल्या आहेत की, कोणीही व्यक्ती राज्य परिवहन वाहनातून स्फोटक / ज्वालाग्राही पदार्थ वाहून नेणार नाही याबाबत सदैव दक्षता बाळगावी़.

27. रातराणी / लांब पल्ल्याच्या गाडयांवर चालकांची नियुक्ती करण्यासाठी विशेष निकष लावले जातात.