Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
  • Goods Transport Services of MSRTC" For more information pl. contact :- 022-23024068
  • किल्ले रायगड दर्शन.... आता एसटीने....ते ही, माफक दरात..!
  • For Technical Assistance ,Please Call 022-23053992
  • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Call-Centre No. 1800221250

Casual Contract

नैमित्तिक करार

दिनांक २८ ऑगस्ट २०१४  पासून रा. प. महामंडळाच्या सेवांचे प्रतिटप्पा दर वाढविण्यात आले आहेत.

नैमित्तीक कराराचे सुधारीत दर, अटी व शर्ती (कार्यपध्दती) खालीलप्रमाणे आहेत.

नैमित्तिक कराराचे दर नेहमीच्या कार्यपध्दतीप्रमाणे खालील दोन हंगामात वेगवेगळे ठरविण्यात आले आहेत.

गर्दीचा हंगाम

कमी गर्दीचा हंगाम 


हंगामाचा कालावधी खालीलप्रमाणे राहील.

अ) गर्दीचा हंगाम - १ मार्च ते ३० जून

ब) कमी गर्दीचा हंगाम - १ जुलै ते २८ / २९ फेब्रुवारी

सेवाप्रकारानुसार नैमित्तीक करारावर देण्यात येणा-या गाड्यांचे एकेरी व दुहेरी फेरीकरीता आकारावयाचे प्रति कि़ मी़ सुधारीत दर पुढील प्रमाणे असून ते दिनांक २८ ऑगस्ट २०१४ पासून (दिनांक २७.०८.२०१४ व २८.०८.२०१४ च्या मधील मध्यरात्र) पासून अमलातआलेले आहेत.

(अ) प्रति कि़ मी़ दर रुपयाच्या पटीत परंतु १ ते ४९ पैसे मागील तर ५० ते ९९ पैसे पुढील रूपयाच्या पटीत पूर्णाकित केलेले आहेत.

(ब) एकेरी फेरीचे दर दुहेरी फेरीच्या दरापेक्षा ७५% ने जास्त ठेवण्यात आले आहेत.

(क) साध्या सेवेत साधी २X३ व परिवर्तन २X३ बसेसचा समावेश करण्यात आला आहे.

(ड) परिवर्तन २X२ व मिडी बसेसचे कि़ मी़ दर स्वतंत्र दिलेले आहेत.

(ई) सध्या रा. प. महामंडळाच्या वाहतुकीत मिनी बस, डिलक्स व महाबस सेवा चालनात नसल्याने त्यांचे नैमित्तीक कराराचे कि़ मी़ दर दिलेले नाहीत.

(फ) वातानुवूत्र्लीत शितल, शिवनेरी व साध्या सेवेतील मिडीबसचे कि़ मी़ दर दोन्ही हंगामात सारखेच ठेवण्यात आलेले आहेत.

(ग) अशा प्रकारे सेवानिहाय नियोजित प्रति कि़. मी़. दर खालीलप्रमाणे आहेत.

सेवा प्रकार व आसनक्षमता गर्दीचा हंगाम
(१ मार्च ते ३० जून)
प्रति कि.मी. दर INR
कमी गर्दीचा हंगाम
(१ जुलै ते २८/२९ फेब्रुवारी)
प्रति कि.मी. दर INR
दुहेरी एकेरी दुहेरी एकेरी
अ) साधी सेवा ४० आसनापर्यत ३७ ६५ ३५ ६१
५० आसनापर्यत ४७ ८१ ४३ ७६
५५ आसनापर्यत ५१ ९० ४८ ८४
६६ आसनांपर्यत ६१ १०८ ५७ १००
ब)परिवर्तन बस (२×२) ४५ आसनापर्यत ४८ ८३ ४२ ७३
५० आसनापर्यत ५३ ९२ ४७ ८१
क) निमआराम सेवा ४० आसनांपर्यत ४६ ८० ४० ७०
५० आसनापर्यत ५७ १०० ५० ८८
ड)वातानुवूत्र्लीत निमआराम(शितल) ४५ आसनांपर्यत ७० १२२

७०

१२२

ड) वातानुकुलित शिवनेरी ४५ आसनांपर्यत ९५ १६६ ९५

१६६

ई) मिडीबस (साधी सेवा ) ३२ आसने ४२ ७३

४२

७३

३. परिपत्रक क्रमांक ३१/२०१३-राप / वाह / चालन / सा़ ८८ / नै क़ / ७८२२ दिनांक १९ डिसेंबर, २०१३ दिलेल्या सूचनेनुसार ब-याच पक्षकारांना कमी अंतरासाठी व कमी कालावधीसाठी बसेसची आवश्यकता असते़ ज्यामध्ये बस २४. ०० तास तसेच ३०० कि़.मी़. पर्यत वापर करणे नेहमीच शक्य होत नाही, हे विचारात घेऊन पुढीलप्रमाणे दिलेली सूचना या पुढेही चालू ठेवण्यात येत आहे.

(अ) बस १२.०० तासांचे आंत परत आल्यास किमान आकार २०० कि़.मी. चा लावणे उर्वरीत रकमेचा नियमानुसार परतावा करण्यात येईल

(ब) १२.०० तासांच्या आत परंतु, २०० पेक्षा जास्त कि़.मी़. झाल्यास, होणा-या कि़.मी. चा आकार पक्षकाराकडून महामंडळास देय राहील.

(क) १२.०० तासांनंतर बस आल्यास, किमान ३०० विंत्र्वा प्रत्यक्ष कि़.मी. यामधील जे जास्त असतील ते कि़.मी. आकारणी करता धरले जातील.

(ड) २४ तासांसाठी नैमित्तीक करारावर घेतलेली बस २४.०० तासांनंतर आल्यास, त्यास वाढीव १२.०० तासांचे म्हणजेच किमान २०० विंत्र्वा प्रत्यक्ष यापैकी जे जास्त असतील ते कि़.मी़. आकारण्यात येतील. वाढीव १२.०० तासांनंतर बस आल्यास, तो दुसरा दिवस (२४.०० तास) धरुन आकारणी करण्यात येईल.

४. सध्या नैमित्तीक कराराच्या साध्या सेवेच्या बसमधून देण्यात येणारी २५ टक्के उभ्याने प्रवासी नेण्याची सवलत यापुढेही चालू राहिल तसेंच आता साध्या सेवेच्या मिडी (यशवंती) बसमधून ही सवलत देण्यात येत आहे.

५. यापुर्वी नैमित्तीक करारात ३०० पेक्षा जास्त आकारणीय कि़.मी. झाले असता बील आकारणी करताना देण्यात येणारी २ टक्केची सवलत बंद करण्यात येत आहे.

६. यापुर्वी नैमित्तीक करारात ३०० कि़.मी़. पेक्षा जास्त कि़.मी़. झाले असतां आगार ते प्रवासी घेण्याचे ठिकाण या ठिकाणी जाऊन येऊन होणारे प्रत्यक्ष अंतर व २० कि़.मी़. यापैकी जे अंतर कमी असेल त्या अंतराची एकुण कि़ मी़ मधून वजावट ही देण्यात येणारी सवलत बंद करण्यात येत आहे. (परिपत्रक क्रमांक ४७/२००६ मधील अ.क्रमांक २ रद्द करण्यात येत आहे)

७. पत्र क्रमांक राप / वाह / चालन / सा़ ८८ / नै़ क़ / ९८१८ दिनांक ११ डिसेंबर, २००८ मधील अ. क्रमांक १मध्ये रद्द न करण्यात आलेल्या नैमित्तीक करारावरील बसेसची नैमित्तीक कराराची तारीख बदलण्याबाबत दिलेली सूचना यापुढेही चालू राहील.

८. मिडी (यशवंती) व वातानुकूलित बसेसच्या बाबतीत कि़.मी. चे दर दोन्ही हंगामात सारखेच राहतील.

९. परिपत्रक क्रमांक ५/९९ - राप / वाह / चालन / सा़ ८८ / १६७२ दिनांक ६. ३. १९९९ अन्वये कळविल्याप्रमाणे मागणी आल्यास त्या परिपत्रकात नमूद केलेल्या अटीशींच्या अधीन राहून रात्रीच्या वेळी नैमित्तीक करारावर गाडया देण्यात येतील.

१०. रा. प. महामंडळाचे ट्रक / टॅँकर्स उपलब्ध असल्यास ते नैमित्तीक करारावर देतांना या कार्यालयाची पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता नाही, उपरोक्त ट्रक / ट्रँकर्ससाठी बिलाची आकारणी ५५ आसन क्षमतेच्या गाडीच्या गदीच्या हंगामातील प्रती कि़ मी़ च्या दराने परंतु किमान आकार व इतर आकारणी साध्या गाडीच्या आकारणीप्रमाणे करण्यात यावी़ ११. सर्वच राजकीय पक्षाना, पक्षानी आयोजीत केलेल्या कार्यक्रमांकरीता रा. प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस नैमित्तीक करारावर उपलब्ध करून देण्यात येतील, त्याकरीता नियमानुसार अनामत रक्कम स्वीकारून नैमित्तीक करार करून घेण्यात यावा़ सर्व प्रकारच्या नैमित्तीक करारात (सौंदत्ती यात्रा वगळूण) खोळंबा आकार पुर्णपणे माफ करण्यात येत असून तो पक्षकाराकडून वसूल केला जाणार नाही़ सर्व प्रकारच्या नैमित्तीक करारात ज्यावेळेपासून पक्षकारास बस नैमित्तीक करारावर हवी आहे, त्या वेळेपासून २४. ०० तास अशी गणना करण्यात यावी़ सर्व प्रकारच्या नैमित्तीक करारात (सौंदत्ती यात्रा वगळून) चालकाचा अतिकालीक भत्ता पक्षकाराकडून वसूल करू नये़ या कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक ३१/२०१३-राप / वाह / चालन / सा़ ८८ / नै़ क़ / ७८२२ दिनांक १९ डिसेंबर, २०१३ दिलेल्या सूचनेनुसार मिडी बसेस नैमित् तीक करारावर देण्याचे अधिकार आगार व्यवस्थापकांना देण्यात येत आहेत.

विद्यार्थी सवलतीचे दर

(अ) शैक्षणिक सहलीसाठी शाळांना देण्यात येणा-या बसेसबाबत पत्र क्रमांक राप / वाह / चालन/ सा़ ८८/ नै़ क़ / ६६४३ दिनांक ६ डिसेंबर, २००५  मधील सुचनांनुसार बसेसची संख्या व कि़ मी़ बाबतची मर्यादा रद्द करण्यात आली असून त्यांच्या मागणीनुसार बसेस पुरविण्यात याव्यात.

(ब) शाळा - कॉलेजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीच्या नैमित्तिक कराराच्या भाडयात ५० टक्के प्रमाणे सवलत देण्याचा महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एसटीसी-३४०१ / सीआर-४२ / भाग १ /परि -१ दिनांक ५ डिसेंबर, २००५ अन्वये घेतल्यानुसार ५० टक्के सवलत देऊन ५० टक्के दराने आकारणी केली जाते़

विद्यार्थी सवलतीचे दर खालीलप्रमाणे आहेत.
 

 सेवा प्रकार गाडीची आसन क्षमता सर्वसाधारण प्रवाशांना नैमित्तीक कराराचा प्रस्तावीत दर
INR
विद्दयार्थी सवलतीचे ५० टक्के दराने शासनाकडून प्रतिपुर्तिसाठी मागावयाचे दर
INR
५० टक्के सवलत वजा जाता विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष घ्यावयाचे प्रस्तावीत दर
INR
साधी सेवा ४० आसनांपर्यत ३७. ०० १८.५० १८.५०
५० आसनांपर्यत ४७.०० २३.५० २३.५० २३.५०
५५ आसनांपर्यत ५१. ०० २५. ५० २५. ५०
६६ आसनांपर्यत ६१. ०० ३०. ५० ३०. ५०
परिवर्तन बस (२×२) ४५ आसनापर्यत ४८.०० २४.०० २४.००
  ५० आसनंपर्यत ५३.०० २६.५० २६.५०

(क) विद्दयार्थ्यांसाठी नैमित्तीक करारावर दिल्या जाणा-या बसेसमध्ये २५% उभे प्रवासी नेण्याची सवलत दिली जाणार नाही, विद्यार्थी सवलत केवळ साध्या व परिवर्तन गाडीच्या नैमित्तीक कराराच्या कि़ मी़ च्या दरावरच देण्यात येईल.
(ड) वरील सवलतीचे दर फक्त महाराष्ट्राराज्या पुरतेच मर्यादित असून महाराष्ट्रा राज्यातील विद्यार्थ्यांसाठी लागू राहतील, इतर राज्यात व इतर राज्यातील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दराने नैमित्तिक करारावर बस देण्यात येणार  नाही.
(ई) मिडी(यशवंती), निमआराम(हिरकणी), वातानुवूत्र्लीत (शिवनेरी, शीतल) बसेस विद्यार्थ्यांना सवलतीच्या दराने दिल्या जाणार नाहीत.
(फ) महाराष्ट्र शासनाने वेगवेगळया सवलतीची प्रतिपूर्ती महामंडळास देण्याचा निर्णय एसटीसी- ३४०० / ६३१ सीआर-३१ / परि-१ दिनांक २०. ६. २००२ अन्वये घेतलेला आहे, त्यानुसार नैमित्तीक करारावर विद्द्यार्थ्याना ५० टक्के सवलतीच्या दराने दिलेल्या गाडयावरील उर्वरीत ५० टक्के रकमेच्या सवलतीची प्रतिपूर्तीची शासनाकडे मागणी करण्यात येते.
(ग) नैमित्तीक कराराच्या कि़ मी़ च्या दरात सर्वसाधारण प्रवाशांना जी सूट दिली जाते तीच सूट विद्यार्थ्याना सुध्दा शासनाकडून पूर्ण रक्कम प्राप्त झाल्याने देणे उचित ठरते आणि तशी सूट न देता शासनाकडून प्रतिपूर्ती मागितल्यास मागेपुढे त्यांच्याकडून आक्षेप येऊ शकतो, म्हणून शासनाकडून प्रतिपूर्ती मागावयाचा प्रति कि़ मी़ दर खालील सूत्राप्रमाणे आकारण्यात यावा़

सर्वसाधारण प्रवाशांना गर्दीच्या हंगामातील प्रति कि़ मी़ दर

-(वजा) विद्द्यार्थ्याना लावलेला प्रतिकि़ मी़ सवलतीचा दर = शासनाकडून मागावयाच्या प्रतिपूर्तीचा प्रति़ कि़ मी़ दर

(दिनांक १४. ५. २००३ पासून कार्यान्वित असलेले हे सूत्र पुढे तसेच चालू ठेवण्यात येत आह़े) किमान आकार (प्रतिदिन प्रतिबस)

अ) नैमित्तीक करारावर देण्यात येणा-या बसेसचे किमान दर खाली नमूद केल्यानुसार राहातील.

बसेसचा प्रकार प्रतिबस प्रतिदिन किमान आकार (`)
१. सर्व प्रकारच्या साध्या बस गाडया प्रति कि़ मी़ दर ट ३०० कि़ मी़
२. सर्व प्रकारच्या परिवर्तन २×२ बस गाडया प्रति कि़ मी़ दर ट ३०० कि़ मी़
३. सर्व प्रकारच्या निमआराम बस गाडया प्रति कि़ मी़ दर ट ३०० कि़ मी़
४. सर्व प्रकारच्या निमआराम वातानुवूत्र्लीत बस गाडया प्रति कि़ मी़ दर ट ३०० कि़ मी़
४. सर्व प्रकारच्या वातानुकुलीत बस गाडया * प्रति कि़ मी़ दर ट ४५० कि़ मी़ *

टीपः सर्व नैमित्तीक करारासाठी अनामत रक्कम किमान ३०० कि़ मी़ चा आकार अधिक सेवाकर एवढी स्विकारण्यात येईल व सध्याच्या पध्दतीनुसार एवूत्र्ण बिलाच्या १०% अतिरिक्त रक्कम आकारण्यातयेईल

* रा. प. महामंडळाच्या चालनात असलेल्या बहुतांश बसेस या कि़ मी़ भाडेतत्वावर घेतलेल्या असल्याने त्यांचे प्रतिदिन किमान ४५० कि़ मी़ होणे बंधनकारक असल्याने या ठिकाणी प्रतिदिन ४५० कि़ मी़ धरण्यात येईल.

अ) किमान आकारः

शालेय विद्यार्थ्याना सवलतीने देण्यात येणा-या बसेसच्या बिलावरील प्रतिदिन किमान आकार खालील प्रमाणे़

बसेसचा प्रकार प्रतिबस पुर्ण दिवस (२४तास) किमान आकार INR
१. सर्व प्रकारच्या साध्या बस गाडया प्रति कि़ मी़ दर ट ३०० कि़ मी़
२. सर्व प्रकारच्या परिवर्तन २×२ बस गाडया प्रति कि़ मी़ दर ट ३०० कि़ मी़

ब) खोळंबा आकारः

खोळंबा आकार व चालकाचा अतिकालीक भत्ता सर्व साधारण नैमित्तीक करारधारकांना माफ करण्यात आला असल्याने विद्द्यार्थ्याना देण्यात येणा-या नैमित्तीक कराराना खोळंबा आकार व चालकाचा अतिकालीक भत्ता आकारण्यात येणार नाही, परंतु विद्द्यार्थ्यासाठी देण्यात येणा-या नैमित्तीक कराराचा प्रतिदिन प्रतिबस किमान आकार त्या सेवेचा प्रति कि़ मी़ दर ३०० कि़ मी़ प्रमाणे आकारण्यात येईल.

यल्लंम्मा (सौंदत्ती) यात्रेसाठी नैमित्तिक करारावर देण्यात येणा-या बसेसना पुर्वी दोन हंगामात खोळंबा आकार कळविण्यात आला होता, त्यात बदल करून आता सर्व कालावधीमध्ये सेवानिहाय खोळंबा आकार आकारण्याच्या सूचना देण्यात येत असून परिवर्तन बसचा आता साध्या सेवेच्या बसेसप्रमाणे खोळंबा आकार आकारण्यात येईल, विभाग नियंत्रक, रा. प. कोल्हापूर यांनी या कार्यालयाचे पत्र क्रमांक राप / वाह / चालन / सा़ ८८ / नै़ क़ / १४२६ दिनांक ९ मार्च, २०११ अन्वये किमान आकाराबाबत दिलेल्या सुचनेनुसार कार्यवाही करावी़ याबाबत असे नमूद करण्यात येते की, सर्वसाधारण नैमित्तीक करारात खोळंबा आकार व चालकाचा अतिकालीक भत्ता पक्षकाराकडून वसूल न करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यल्लंम्मा (सौंदत्ती) यात्रेसाठी नैमित्तिक करारावर देण्यात येणा-या बसेस या जास्त दिवसासाठी देण्यात येत असल्याने खास बाब म्हणून प्रतिकरार प्रतिबस किमान आकार हा त्या सेवेचा प्रति कि़ मी़ दर  होणारे कि़. मी. याप्रमाणे आकारण्यात येईल व खोळंबा आकार व चालकाचा अतिकालीक भत्ता सध्याच्या दराप्रमाणेच वसूल करण्यात येऊन यल्लंम्मा (सौंदत्ती) यात्रेसाठी नैमित्तीक करारावर बस देताना खालील सुत्रानुसार अनामत रक्कम घेण्यात येईल.

दिनांक २८ ऑगस्ट २०१४

कि़. मी़. आकार + खोळंबा आकार (अंदाजे)  ११० = अनामत रक्कम
__________________________________________

 १००

खोळंबा आकार/बस प्रकार  प्रति तास खोळंबा आकार INR
सर्व कालावधीमध्ये
 साध्या बसेस (साधी/जलद/ रात्रसेवा/ परिवर्तन/मिडी) ९८
 निमआराम बसेस ११९