Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
  • Goods Transport Services of MSRTC" For more information pl. contact :- 022-23024068
  • किल्ले रायगड दर्शन.... आता एसटीने....ते ही, माफक दरात..!
  • For Technical Assistance ,Please Call 022-23053992
  • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Call-Centre No. 1800221250

Stores & Purchase


(अ) भांडार व खरेदी खात्याच्या कामकाजा विषयी माहिती

(ब) महाराष्ट्र शासनाचे नवीन खरेदीचे धोरण

(क) भांडार व खरेदी खात्याचे सामान्य स्थायी आदेश

   १) सा.स्था.आं.क्र.९९९ - भंगार सामानाची विल्हेवाट. (दि. १८.१०.१९७९)
   २) सा.स्था.आं. क्र. १४०२- स्थानिक खरेदी(दि.२३.०७.१९७६)
   ३) सा.स्था.आं. क्र. ९६९- विभागांना भांडवली वस्तूंचा  (ऑफीस उपकरणे , फर्निचर इ.) पुरवठा(दि.३०.०६.१९७७)
   i) सा.स्था.आ.क्र.१२०९ सन २०११ ( सा.स्था.आ.क्र.९६९ मध्ये सुधारणा )
   ii) सा.स्था.आ.क्र.९३ सन २०१४ ( सा.स्था.आ.क्र.१२०९ मध्ये सुधारणा )

(ड) भांडार व खरेदी खात्याची परिपत्रके

   १) प्रादेशिक व्यवस्थापन विभाग नियंत्रक यांना हस्तांतरित केलेले अधिकार(पत्र क्र. १२१४ दि.३१.१२.२००५)
   २) कमी मूल्याच्या भांडवली वास्तुन्च्ये  विकेंद्रीकरण करणेबाबत(परिपत्रक क्र. ०३ दि. २५.११.२००८)
   ३) नवीन टायरचा वापर व कि.मी. नोंदीबाबत(परिपत्रक क्र. ०१ दि. ०४.०२.२०१६)  
   ४) नवीन बॅटरीचा वापर व प्राप्त दिवस नोंदीबाबत(परिपत्रक क्र. ०३ दि.१६.०३.२०१६)
   ५) प्रयोगशाळा तपासणीमध्ये नमुने नापास झाल्यावर पुरवठादारावर करण्यात येणा-या दंडात्मक कारवाई
        बाबत(परिपत्रक क्र. ०४ दि.१९.०३.२०१६)   
६) दरकरार बँक हमीपत्राचे नियंत्रण रजिस्टर ठेवणेबाबत(पत्र क्र. ९१० दि.०७.०४.२०१६)


(ई) भांडार वस्तूंचे अ, ब व क वर्गीकरण - स्वयंचल व सर्वसाधारण वस्तू 


भांडार व खरेदी खात्याच्या कामकाजा विषयी संक्षिप्त माहिती

रचना ,कार्ये व कर्तव्य यांचा तपशीलः-

(१) महाव्यवस्थापक (भांवख) यांचे अधिकार व कर्तव्ये :-

महामंडळाच्या वाहतूक सेवेसाठी भां व ख खात्याचा सहभाग इतर शाखांना सेवा पुरविण्याचा आहे़ थोडक्यात भांडार व खरेदी खाते हे सेवा शाखा म्हणून कार्यरत आहे़. महामंडळाचे प्रवासी वाहतूकीचे मुख्य उद्दिष्ट्य तत्परतेने व योग्यरित्या साध्य करण्यासाठी वाहतूक शाखा व यंत्र आभयांत्रिकी शाखेला प्रामुख्याने हे खाते सेवा पुरवते या खात्याचे कार्य प्रमुखांचे कार्य की रा़प़ महामंडळाच्या वापरातील सुमारे १७,५०० गाडयांच्या दैनंदिन देखभाल, दुरुस्ती व पुनर्स्थितीकरणासाठी लागणारे सर्व सुटे भाग, बसबॉडी दुरुस्तीसाठी लागणा-या इतर सर्वसाधारण वस्तू,मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये नवीन बस गाडयांचे निर्मितीसाठी लागणा-या सर्वसाधारण वस्तू, इंजिन, एफ आय पंप, पुनःस्थितीकरणासाठीचे सुटेभाग, टायर पुनःस्तरणासाठी लागणा-या वस्तु, विविध प्रकारचे फॉर्मसछपाईसाठी लागणारा कागद व मुद्रण साहित्य, कर्मचा-यांना लागणारे गणवेषाचे कापड व इतर देयके, कार्यशाळांमधील यंत्रे - हत्यारे, कार्यालयीन वापराचे फर्निचर व स्टेशनरी, कार्यालयीन उपकरणे इ़ वस्तूंची खरेदी, साठा व वितरण हे भांडार व खरेदी खात्याकडून केले जाते़ तसेच भांडार साठा नियंत्रण करणे, खरेदी विकेंद्रिकरणाची कार्यप्रणाली योग्यरीत्या चालते किंवा नाही या बाबत निरिक्षण करणे, भांडार साठा नियंत्रण, कार्यप्रणालीत सुसुत्रता आणणे इ़ कामे देखिल भांडार व खरेदी खात्याकडून करण्यात येतात.

(२) अधिकारी यांचे अधिकार व कर्तव्ये :-

महामंडळाचे मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे स्वतंत्र भांडार व खरेदी विभाग कार्यरत आहे. या खात्याचे प्रमुख महाव्यवस्थापक (भांडार व खरेदी) असून त्यांच्या अधिपत्याखाली खालील घटक स्तरावर भांडाराची कार्यप्रणाली चालते़

अ) मध्यवर्ती कार्यालयः-

उपमहाव्यवस्थापक (भांडार) :- भांडार साठा नियंत्रण करणे, खरेदी विकेंद्रिकरणाची कार्यप्रणाली योग्यरीत्या चालते किंवा नाही या बाबत निरिक्षण करणे, भांडार साठा नियंत्रण, कार्यप्रणालीत सुसुत्रता आणणे. वरिष्ठ भांडार अधिकारी (स्वं):- बस गाड्यांसाठी लागणारे सुटे भाग खरेदीची प्रक्रीया करणे व त्या साठी आवश्यक स्त्रोत उपलब्ध करुन देणे़

वरिष्ठ भांडार अधिकारी (सर्व-१):-बस गाडयांसाठी लागणारे साहित्य खरेदीची प्रक्रीया करणे, कामगारांच्या गणवेषाचे कापड खरेदीची प्रक्रीया करणे, तसेच कार्यालयीन कामासाठी कार्यालयीन साहित्य उपलब्ध करुन देणे व त्या साठी आवश्यक स्त्रोत उपलब्ध करुन देणे़

वरिष्ठ भांडार अधिकारी (सर्व-२):-बस गाडयांसाठी लागणारे डिजेल, सर्व प्रकारची ऑटोमोबाईल तेले, टायर, ट्यूब,फ्लॅप,टायर रिट्रेडिंग मटेरीयल, इ़ वस्तू खरेदीची प्रक्रीया करणे व त्यासाठी आवश्यक स्त्रोत उपलब्ध करुन देणे़

ब) मध्यवर्ती प्रिटींग प्रेस ,कुर्ला, मुंबई़ः- या ठिकाणी महामंडळास आवश्यक असणा-या मुल्यवर्धित फॉर्मसहित इतर महत्वाच्या प्रिंटेड फॉर्मसची छपाई करुन सर्व विभागांना पुरवठा केला जातो़ तसेच काही सर्वसाधारणवस्तुंचा पुरवठा विभागांना केला जातो़


क) मध्यवर्ती कार्यशाळा :-मध्यवर्ती कार्यालय, भांडार व खरेदी खात्याने केलेल्या दरकरारानुसार आवश्यक वस्तुंचे खरेदी आदेश टाकणे़ सांगाडे उत्पादनासाठी आवश्यक इंजिन, एफ.आय. पंप पुनःस्तरीकरणासाठी लागणा-या आवश्यक सामानाचा साठा नियमित भांडारात उपलब्ध ठेवणे़

) विभाग पातळीवर विभागीय भांडार :- मध्यवर्ती कार्यालय भांडार व खरेदी खात्याने केलेल्या दरकरारानुसार आवश्यक वस्तुंचे खरेदी आदेश टाकणे व आवश्यक सामानाचा साठा नियमित भांडारात उपलब्ध ठेवणे व विभागा अंतर्गत येणा-या सर्व आगारांना आवश्यकते नुसार सामानाचा पुरवठा करणे़

) विभागा अंतर्गत आगार :- विभागीय पातळीवरील भांडाराकडून आगारास आवश्यक असणा- या सर्व प्रकारच्या सामानाची वेळोवेळी मागणी करुन आगारात सामाना अभावी वाहन नादुरुस्त राहणार नाही याची दक्षता घेणे. यासाठी आगारातील भांडारात सामानाचा साठा उपलब्ध ठेवणे़

(२)भांडार व खरेदी खाते - मध्यवर्ती कार्यालयाचे कामकाज-

१) खुल्या निविदा काढून वा इतर शासकीय दरकरारावर आधारीत विविध वस्तुच्या खरेदीचे प्रस्ताव महामंडळाने निश्चित केलेल्या विविध प्राधिकार समित्यांस, पुरवठादार व वस्तुंचे धंदेवाटप निश्चित करण्यासाठी सादर करणे, त्या प्रमाणे पुरवठादारांशी दरकरार करणे व ते खरेदीच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी विविध विभागांस व मध्यवर्ती कार्यशाळांना वितरीत करणे, पुरवठादारांकडून दरकराराप्रमाणे निश्चित केलेले दर, वस्तूंचा दर्जा व पुरवठयाचे कार्यपालन योग्य प्रकारे होत असल्याची दक्षता घेणे व नियंत्रण ठेवणे़

२) विविध विभागांस वस्तू खरेदीसाठीची वार्षिक आर्थिक तरतूद करुन देणे (बजेट) व त्यावर नियंत्रण ठेवणे़

३) विभागांमध्ये होणारी खरेदी, वस्तूसाठा व वितरण याचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे़

४) महामंडळाच्या कामकाजासंबंधी भांडार व खरेदी खात्याशी संबंधीत धोरणात्मक बाबीं / नियम व कार्यप्रणाली ठरविणे व त्याची अंमलबजावणी करणे़

५) भंगार सामानाच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे़

६) मध्यवर्ती प्रिंटिंग प्रेस, कुर्ला :-या ठिकाणी महामंडळास आवश्यक असणार्‍या प्रिंटिंगच्या वस्तू व फॉर्म तसेच मुल्यवर्धीत फॉर्मससहित इतर महत्वाच्या प्रिंटिंग वस्तूंची छपाई करुन सर्व विभागांना पुरवठा केला जातो़ तसेच काही सर्वसाधारण वस्तूंचाही पुरवठा विभागांना केला जातो़ आजमितीस मध्यवर्ती प्रिंटिंग प्रेस महामंडळाच्या मुंबई विभागाशी संलग्न केलेले आहे़

७) विभाग व मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये चालणारे कामकाजः-  विभागीय पातळीवर अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यात आलेले आहे व प्रादेशिक व्यवस्थापक समितीचे सर्व अधिकार हे विभागीय व्यवस्थापक समितीना प्रदान केल्यामुळे भांडारासंबंधी सर्व प्रकारची कार्य व निर्णय हे विभागीय पातळीवर घेवून दैनंदिन कामकाज चालविण्यात येत आहे़

अ) मध्यवर्ती कार्यालयाने निश्चित करुन दिलेल्या दरकरारांच्या आधन राहून विभागातील प्रत्येक वस्तूच्या खपाच्या प्रमाणात प्रत्यक्ष होणा-या उत्पादनाशी ताळमेळ घालून वस्तूंची खरेदी करणे, वस्तूंचा विहीत मर्यादेपर्यंत साठा करणे, व विभागिय कार्यशाळांमध्ये गाडयांची दुरुस्ती व देखभालीसाठी लागणा-या दैनंदिन वस्तूंचे वितरण करणे़ तसेच विभागाच्या अखत्यारितील आगारांना वस्तूंचा नियमीत पुरवठा करणे़ टायर पुनः स्तरणासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी, साठा व वितरण करणे

ब) विभाग अंतर्गत आगारांना डिझेल पुरवठयाचे नियोजन करणे व प्रत्यक्ष पुरवठयावर नियंत्रण राखणे, डिझेल पंप दुरुस्ती व देखभाल करुन घेणे़

क) गाडयांचे दैनंदिन देखभाल/दुरुस्तीतून निर्माण होणारे भंगार सामान भंगार आवारात प्रचलीत कार्य पध्दती प्रमाणे सुयोग्य पध्दतीने मांडणी करुन मध्यवर्ती कार्यालयाने निश्चित केलेल्या आधकृत लिलावदारां मार्फत वर्षातून २ - ३ वेळा लिलावाचे नियोजन, भांडार व खरेदी खाते, मुंबई, यांचे मार्गदर्शनाखाली करुन लिलावाद्वारे विक्री करणे व खरिददारांना त्यांचे वितरण करणे़ आगाराचे कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे

ड) मध्यवर्ती कार्यशाळांमध्ये नविन बस बांधणीसाठी, इंजिन व एफ.आय. पंप पुनःर्स्थितीकरणासाठी लागणा-या वस्तूंच्या खरेदीचे नियोजन, प्रत्यक्ष खरेदी, साठा व वितरण करणे, कार्यशाळेतील विविध यंत्राचे दुरुस्ती व देखभालीसाठी लागणा-या वस्तूंची व हत्यारांची खरेदी, यंत्र सामग्रीची आवश्यकते प्रमाणे प्रचलीत नियमा प्रमाणे खरेदी करणे, भंगार सामानाचे व्यवस्थापन, विक्री व वितरण करणे इ. कामे केली जातात.

८) आगार स्तरावरिल कामकाज - आगारा अंतर्गत वाहनांचे दैनंदिन दुरुस्ती व देखभालीसाठी लागणा-या वस्तूंची विभागीय भांडाराकडून वेळोवेळी मागणी, साठा व वितरण करणे, तातडीची गरज भासल्यास वस्तूंची विहीत आर्थिक मर्यादेत स्थानिक खरेदी करणे त्यांचे हिशेब व नियंत्रण करणे़ आगारातील वाहन चालनास आवश्यक त्या प्रमाणात डिझेलचे नियोजन, मागणी, साठवणूक व वितरण इ भांडार विषयक कामे या स्तरावर चालतात़

९) खरेदी कार्यपध्दतीः- (अ) मध्यवर्ती भांडार व खरेदी खात्यामार्फत मर्यादीत निविदा, खुल्या निविदा तसेच रा़.मा़.प. उपक्रम संघटनेच्या दरकरारावर आधारीत पुरवठादार निश्चित करुन वार्षीक दरकरार केले जातात़ व त्या प्रमाणे लागणा-या वस्तूची खरेदी विभाग व मध्यवर्ता कार्याळा या विविध स्तरांवर वस्तूंचा खप व होणारे उत्पादन या आधारे केली जाते निविदा निश्चित करण्यासाठी विविध समित्यांना महामंडळाने प्राधिकार दिले आहेत़ मुल्यावर आधारित सुत्राचा अवलंब करुन पुरवठादार निश्चिती व धंदेवाटप केले जाते़ तथापि प्रचलित खरेदी पध्दतीत सुधारणा करुन, निविदा व कार्यपध्दतीत बदल करुन खरेदी पध्दतीत योग्य पारदर्शकता येण्यासाठी पुरवठादारांना निवीदा पुर्वपात्रता अटींचे निकष लावण्याची प्रणाली तसेच दोन लिफाफा पद्धती (तांत्रिक व व्यापारी) सुरु करण्यात आलेली आहे त्याची अंमलबजावणी व्यापक प्रमाणात करण्यात येत आहे.

भांडार वस्तू खरेदीचे निर्णय घेण्यासाठी वेगवेगळ्या समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत त्या समित्या खालील प्रमाणेः-

१. निविदा व भांडार समिती :-

 महसूली व भांडवली वस्तू रु़. १ कोटी व त्या वरील खरेदी चे अधिकार

२. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचेपर्यंतची खातेनिहाय समिती़ः

महसूली व भांडवली वस्तू  रु़. १० लाख ते रु़ १ कोटी पर्यंत़ खरेदीचे अधिकार 
 

३. महाव्यवस्थापक (भांवख) यांचे पर्यंतची खातेनिहाय समितीः महसूली व भांडवली वस्तू रु़ १० लाख पर्यंत खरेदीचे अधिकार.

उपरोक्त समित्यांनी घेतलेल्या निर्णया नुसार पुरवठादारां कडून बँक हमी पत्र स्विकारुन वार्षिक किंवा व्दैवार्षिक दरकरार वितरीत करण्यात येतातय़ा दरकरारांच्या प्रती मध्यवर्ती कार्याळा व विभागांना भांडार वस्तू खरेदी साठी वितरीत करण्यात येतात

(ब) पुरवठादारांची निवड, दर, अटी-शर्ती व धंदेवाटप निश्चित करण्याची पध्दत़ (मध्यवर्ती भांडार व खरेदी खाते) :-

महामंडळाने विविध वस्तूंचे खरेदी साठी पुरवठादारांचे निवडीबाबतचे दर/मुल्यावर आधारित निकष ठरविले असून खरेदी प्रक्रीयेत पारदर्शकता आणलेली आहे. न्युनतम देकारदारांकडून जास्तीत जास्त परिमाण खरेदीचे धोरण अवलंबवितेवेळी त्यांचे उत्पादनाचा दर्जा व पुरवठयाची क्षमता, इ. बाबी विचारात घेतल्या जातात. संवेदनशील व अती महत्वाच्या वस्तुचे पुरवठयासाठी मुळ उत्पादक/ पुरवठादारांच्या निवडीला दरांचे स्पर्धात्मकते बरोबर प्राधान्य दिले जाते़ तसेच निविदा पध्दती मध्ये पुर्वपात्रता अटीं पध्दतीचा अवलंब करुन दर्जेदार व नामांकित पुरवठादारांच्या निविदा प्राप्त होण्यासाठी कार्यप्रणाली अवलंबिलेली आहे.

निविदा व भांडार समितीच्या ठराव क्र. ५४६ दि़ ३-९-१९९९ व ६६६ दि़ १७-०३-२००१नुसार पुरवठादारांची निवड व दरांमधील फरक विचारात घेऊन वस्तुनिहाय धंदेवाटपाचे सूत्र ठरविण्यात आले आहे़. या पध्दतीचा अवलंब केल्याने महामंडळास नामांकित पुरवठादारांची निवड करतांना धंदेवाटपाचे प्रमाण ठरविणे शक्य झालेले आहे. निविदा व भांडार समितीच्या ठराव क्र. ५४६ दि़ ३-९-१९९९ व ६६६ दि़ १७-०३-२००१ नुसार पुरवठादारांची निवड व निविदेतील दरांमधील फरक विचारात घेऊन वस्तुनिहाय धंदेवाटपाचे सूत्र ठरविण्यात आले आहे़

अ़.क्र. तपशील प्रथम स्त्रोतास धंदे वाटप व्दितीय स्त्रोतास धंदे वाटप
दोन्ही देकारधारकांचे दर समान ५० टक्के ५० टक्के
जेथे दोन्ही देकारधारकांच्या दरात १ टक्क्या पर्यंत फरक ५५ टक्के ४५ टक्के
जेथे दोन्ही देकारधारकांच्या दरात १ टक्का ते ५ टक्क्यापर्यंत फरक ७० टक्के ३० टक्के
जेथे दोन्ही देकारधारकांच्या दरात ५ टक्का ते १० टक्क्यापर्यंत फरक ८० टक्के २० टक्के
जेथे दोन्ही देकारधारकांच्या दरात १० टक्क ते १५ टक्क्या पर्यंत फरक ८५ टक्के
१५ टक्के
जेथे दोन्ही देकारधारकांच्या दरात १५  टक्का ते २० टक्क्या पर्यंत फरक  ९० टक्के १० टक्के
       

तीन पुरवठादारांमध्ये धंदे वाटप करावयाचे सूत्र

L3 च्या दराची L1 पेक्षा 
जास्त असलेली टक्केवारी               
L2 च्या दराची L1 पेक्षा 
जास्त असलेली टक्केवारी           
 धंदे वाटप    
    L1    L2       L3
१०.०१ ते १६ १०.०१ ते १६ ८५ १०
१०.०१ ते १६ ५.०१ ते १० ८० १५
१०.०१ ते १६ १.०१ ते ५ ७५ २०
१०.०१ ते १६ ०.०१ ते १ ७० २५
५.०१ ते १० ५.०१ ते १० ७५ १५ १०
५.०१ ते १० १.०१ ते ५  ७०  २० १०
५.०१ ते १० ०.०१ ते १  ६५  २५ १०
१.०१ ते ५ १.०१ ते ५  ६५  २० १५
१.०१ ते ५ ०.०१ ते १  ६०  २५ १५
०.०१ ते १ ०.०१ ते १  ५५  २५ २०

वरिल प्रमाणे धंदे वाटप एल-१ च्या दरांशी ईतर पुरवठादारांचे दर मिळते जूळते करण्याच्या अटीवर करण्यात येत आहे.  

(क) प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प आणि संवितरित केलेल्या रकमांच्या अहवाला नुसार महामंडळामध्ये विविध वस्तूंच्या खरेदीसाठी सन२०१४-१५ या आर्थिक वर्षासाठी सुमारे रु़ ४०१. ७४ कोटी खर्चाची आर्थिक तरतूद केली आहे व त्यातील प्रमुख खरेदीच्या बाबी खालील प्रमाणे आहेत.

    वस्तू गट दरकराराची वैधता (एकुण वस्तूगट) दरकरार वैधतेची टक्केवारी
अ) स्वयंचल सुटेभाग ५२               ४४ ८६.२७ टक्के
ब) इतर सर्वसाधारण वस्तू १४८ १४४ ९७ टक्के ८८               ७७ ८७.५० टक्के
एकुण (अ + ब) १३९                १२१ ८७.५० टक्के

महामंडळात डिझेलच्या खरेदी सन २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी सुमारे रु़२४१७. ९४ कोटीची तरतूद केली आहे़ तसेच इंधन / डिझेल व्यतिरिक्त स्वयंचल वस्तू व इतर सर्व साधारण वस्तूंच्या वार्षिक खरेदी करीता सन २०१३-१४ मध्ये खालील प्रमाणे तरतूद केली आहे़

अ)  स्वयंचल सुटेभाग रु. ८७.०२ कोटी
ब)  बस बॉडी घटक/वस्तू रु. ८६.५४ कोटी
क)  इतर सर्व साधारण वस्तू (टायर, ट्यूब ,फ्लॅप,वंगण,इ़) (ब व्यतीरिक्त) रु. २३७.१८ कोटी
एकूण वार्षिक खरेदी मूल्य रु. ४०१.७४ कोटी

उपरोक्त क मधील इतर सर्व साधारण वस्तूंमधील प्रमुख घटक व त्यांचे वार्षिक खरेदी मूल्य पुढील प्रमाणे आहेत़

वस्तु रु़ कोटीत
१)  वंगण २८.०४ कोटी
२)  टायर, टयुब, फ्लॅप टायर रिट्रेड मटेरिअल १९७.४९ कोटी
३)  बॅटरी १०.६५ कोटी

(ड). महामंडळामध्ये वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्या पाच वर्षात जी खर्चाची तरतूद केली आहे त्याचा तपशील खालील प्रमाणेः- (रु़ लाखात)

अ़.क्र. वस्तूगट २०१०-११ २०११-१२ २०१२-१३ २०१३-१४ २०१४-१५
४१ २०१.५७ २३१.८० २६३.१० ३३२.८० ४२१.०२
४२ ४.०५ ४.६५ १६.७३ २१.१६ २६.७७
५५ ६९९६.३५ ८०४५.८९ ९०००.०९ ११३८५.०० ७८०३.७८
५६ २४८५.६१ २८४६.९५ ३३७७.४३ ४२७२.३१ २८०४.६५
५७ ते ६० १४४६२.२२ १६३३१.५६ १८७१५.३१ २३६७४.८७ १९७४८.७१
६१ १२२४.११ १४०७.७२ १६०२.८१ २०२७.५५ १०६४.८५
६६ ९६.७९ १११.४२ १२६.८२ १६०.४३ २०२.९४
६७ ८९४३.९६ १०२८५.५५ ११७०६.६४ १४८०७.६२ ८९३१.६४
१० ६८ ४५५.२४ ५२३.५३ ७०७.६६ ८९५.१९ ११३२.१९
११ ७५ ९६१.९० ११०६.१८ १२६७.३१ १६०५.६८ १८३१.१९
१२ ७८ ३८६.४९ ४४४.४६ ३७७.१८ ४७८.४१ ५४०.३२
१३ ७९ ६७.४९ ७७.७३ ८९.०२ ११२.६१ १४२.४५
१४ डीझेल १७१५५२.०२ १९७२८४.८२ २२३०१३.१० २४१७९४.९४ २८७९५७.९३
एकूण २०७८२७.८० २३८७०२.२६ २७०२६५.२० २९०१८३.५७ ३३२६०८.६७

सन २०१३-१४ मध्ये भांडार वस्तू खरेदी करण्यासाठी वस्तूंचे ९६% पर्यत दरकरार केल्यामुळे विभागात भांडार साठायोग्य प्रमाणात उपलब्ध झाल्याने स्थानिक पातळीवरील खरेदीचे प्रमाणे कमी झाले आहे़
                                                   Page #1                        
Page #2 >>