msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
वाहतूक :

सामान्य स्थायी आदेश क्र. 1200 दिनांक 10/3/2008
(वाहतूक खात्यामार्फत प्रसारीत)


विषय: आगाऊ तिकीट आरक्षणाच्या परताव्याच्या दरांमध्ये बदल करण्याबाबत व आगाऊ तिकीट आरक्षण धारक प्रवाशांना प्रवास तारीख बदल संधी देण्याबाबत (अंमलबजावणी दि. 1/4/2008 पासुन)

संदर्भ :1) सामान्य स्थायी आदेश क्र. 1028 दिनांक 3/12/1979
         2) सामान्य स्थायी आदेश क्र. 1099 दिनांक 5/8/1985
         3) महामंडळ ठराव क्र. 2007:12:10 दिनांक 19/12/2007

रा.प.महामंडळाने विविध कारणांस्तव प्रवाशांनी प्रवास रद्द केल्यास प्रवाशांना प्रवासभाडे रक्कमेचा परतावा देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. सामान्य स्थायी आदेश क्र. 1028 दिनांक 3/12/1979 मध्ये प्रवासी रकमेच्या परताव्याची टक्केवारी व परतावा देण्याची कार्यपध्द्‌ती विस्तृतपणे नमुद केलेली आहे. सामान्य स्थायी आदेश क्र. 1099 दिनांक 5/8/1985 मध्ये निमआराम, आराम तसेच वातानुकूलित बसेसच्या प्रवासाचा परतावा कशा पध्द्‌तीने द्यावा याबाबात सविस्तर नमुद केलेले आहे.

महामंडळ ठराव क्र. 2007:12:10 दिनांक 19/12/2007 अन्वये सामान्य स्थायी आदेश क्र. 1028 दिनांक 3/12/1979 मधील कलम 3.1 मधील (i) ते (vii) या व कलम 3.2 मधील (i) व (ii) मधील तिकीट रद्द करण्यासाठी 50 पैसे व रु. 1/- या तरतुदी रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सामान्य स्थायी आदेश क्र. 1099 दिनांक 5/8/1985 मधील परताव्यासंबंधी सर्व तरतुदी रद्द करण्यात आल्या आहेत.

महामंडळ ठराव क्र. 2007:12:10 दिनांक 19/12/2007 अन्वये सर्व प्रकारच्या बससेवांसाठी पूर्ण पैसे भरुन आगाऊ आरक्षण केलेले तिकीट रद्द करावयाचे असल्यास सामान्य स्थायी आदेश क्र. 1028 मधील कलम 3.1 मध्ये खालीलप्रमाणे तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.

कलम 3.1
i) गाडी सुटण्याचे नियोजीत वेळेच्या 4 तास अगोदर तिकीट रद्द करण्यासाठी अर्ज केला असेल तर फक्त आरक्षण आकाराची कपात करुन संपुर्ण प्रवास भाडयाची रक्कम प्रवाशास परत करण्यात यावी.
ii) गाडी सुटण्याचे नियोजीत वेळेच्या अर्र्ध्या तासापर्यंत तिकीट रद्द करण्यासाठी अर्ज केला तर प्रवासभाडयाच्या 10 टक्के कपात करण्यात यावी.
(उदासकाळी 11.00 वाजता सुटणा-या गाडीस 10.30 वाजेपर्यंत)
iii) गाडी सुटण्याचे नियोजीत वेळेच्या 30 मिनिटापुर्वी व प्रत्यक्ष गाडी सुटल्यानंतर 2 तासापर्यंत तिकीट रद्द करण्यासाठी अर्ज केला तर प्रवासभाडयाच्या 50 टक्के कपात करण्यात येऊन परतावा देण्यात यावा.
(उदा. सकाळी 11.00 वाजता सुटणा-या गाडीस 10.30 पासून ते 11.00 वाजेपर्यंत (या अर्ध्या तासाच्या कालावधीत) व गाडी सुटल्यानंतर 1.00 वाजेपर्यंत)
iv) तिकीट रद्द करण्यासाठी कोणताही आकार (Cancellation Charges)लावण्यात येऊ नये.
(पुर्वी जो कलम 3.2 मधील (i) व (ii) तरतुदींप्रमाणे 0.50 पैसे व रु 1.00 लावण्यात येत होता.)
v) पुसट खराब झालेल्या, फाटलेल्या किंवा जीर्ण झालेल्या आगाऊ आरक्षण तिकीटावर परतावा मिळणार नाही.

वरील परताव्याचे दर सर्व प्रकारच्या बस सेवा प्रकारांना लागू राहतील. तसेच परताव्याच्या रकमेची आकारणी नजिकच्या रुपयात करण्यात यावी.

सामान्य स्थायी आदेश क्र. 1028 दिनांक 3/12/1979 मधील परताव्या संदर्भातील इतर तरतुदींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. इतर तरतुदीं पुर्वीप्रमाणेच लागू राहतील.

3.अ) प्रवास तारीख बदल संधी :
सामान्य स्थायी आदेश क्र. 1028 दिनांक 3/12/1979 अन्वये रा.प.महामंडळाने प्रवाशांनी विविध कारणांस्तव प्रवास रद्द केल्यास प्रवास रद्द झाल्यास प्रवाशांना प्रवासभाडे रक्कमेचा परतावा देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. परंतु सदर सामान्य स्थायी आदेशामध्ये प्रवाशांना जर काही कारणांस्तव तिकीट आरक्षणाच्या तारखे अगोदर व नंतर प्रवास करावयाचा असल्यास, तशा प्रकारच्या संधीची तरतूद नाही. सदर संधी उपलब्ध नसल्याने प्रवासी तिकीट रद्द करणे पसंत करतात व ऐनवेळी सोय म्हणून अवैध वाहनातून प्रवास करतात त्यामुळे अवैध वाहतूकीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होते. त्यामुळे प्रवाशांस प्रवास तारखेमध्ये बदल करण्याची संधी दिल्यास प्रवासी महामंडळाकडे आणखी आकर्षित होतील, यासाठी महामंडळ ठराव क्र. 2007:12:10 दिनांक 19/12/2007 अन्वये ठराव पारीत करुन आगाऊ तिकीट आरक्षण धारक प्रवाशांना प्रवास तारीख बदल संधी देण्यास मान्यता दिलेली आहे.

अ-I) प्रवास तारीख बदल संधीची वैशिष्टे खालीलप्रमाणे :
i) एखाद्या प्रवाशाला आगाऊ आरक्षण केलेल्या तारखेला प्रवास करावयाचा नसल्यास त्यास आरक्षण तारखेच्या अगोदरच्या तारखेस अथवा नंतरच्या तारखेस प्रवास करावयाचा असेल तर त्यास प्रत्यक्ष बस सुटण्याच्या वेळेच्या चार तास अगोदर संबंधित स्थानकप्रमुखांना भेटून बदल करता येईल. सदर संधी प्रवाशांस विनामुल्य देण्यात येईल.
ii) अशा वेळी संबंधित स्थानक प्रमुख प्रवाशाने अपेक्षित केलेल्या तारखेस बसमध्ये जागा उपलब्ध असल्यास त्याप्रमाणे प्रवाशास नविन तिकीट देतील व जुने जमा करुन घेतील. नविन तिकीटावर स्थानक प्रमुख ’प्रवास बदल संधी तिकीट ’ असे नमुद करतील व त्याप्रमाणे सोबत दिलेल्या परिशिष्ट ’अ ’ मध्ये स्वत:कडे रजिस्टर ठेऊन त्यामध्ये आवश्यक त्या नोंदी करुन घेतील.
iii) प्रवाशाने बदल करुन मागणी केलेल्या तारखेला गाडीमध्ये जागा नसेल व प्रवाशास उभे राहून प्रवास करण्याची इच्छा असल्यास त्यास त्यासाठी कोणतेही आसन आरक्षीत न करता प्रवास करण्याची स्थानक प्रमुख परवानगी देतील. या प्रकरणी प्रवाशास आरक्षण आकार परत मिळणार नाही.
iv) जर एखाद्या प्रवाशाकडे साध्या गाडीचे तिकीट असेल व त्याने मागणी केलेल्या तारखेला साध्या गाडीत सीट उपलब्ध नसेल व इतर प्रकारच्या बसेसमध्ये उदा. सेमी-लक्झरी, लक्झरी, इत्यादी बसमध्ये बसण्यासाठी जागा उपलब्ध असेल व प्रवासी त्या बसमध्ये प्रवास करु इच्छित असेल, तर त्या प्रवाशाकडून भाडयामधील फरकाची रक्कम वसूल करुन स्थानक प्रमुख त्या प्रवाशास प्रवास करु देण्याची सवलत देतील व तशा सविस्तर नोंदी परिशिष्ट ’अ’ मधील रजिस्टरमध्ये करतील.
v) एखाद्या प्रवाशाकडे सेमी-लक्झरी, लक्झरी इत्यादी बसेसचे तिकीट असेल व त्यास आरक्षण तारखेच्या अगोदर अथवा नंतर प्रवास करावयाचा असल्यास व त्याच प्रकारच्या बसमध्ये सीट उपलब्ध नसल्यास इतर प्रकारच्या बसमध्ये सीट उपलब्ध असल्यास, उदा साधीबस, तो प्रवाशी साध्यागाडी मधुन प्रवास करावयास तयार असल्यास त्यास स्थानकप्रमुख त्या प्रवाशाला प्रवासभाडयामधील फरकाची रक्कम परत करुन सवलत देतील व तशा नोंदी परिशिष्ट ’अ’ मधील रजिस्टरमध्ये ठेवतील.
vi) संगणकीय तिकीट असेल तर संगणकीय प्रणालीत स्थानकप्रमुख संबंधितांकडून सदर बदलाची नोंद करुन घेतील व तशी स्वतंत्रपणे नोंद ठेवतील.

अ-II) प्रवास तारीख बदल संधीच्या अटी व शर्ती खालीलप्रमाणे :
i) प्रवास तारीख बदल संधी घेणा-या प्रवाशाने स्थानकप्रमुखाकडे लेखी स्वरुपात अर्ज करणे आवश्यक राहील.
ii) प्रवास तारीख बदल संधी ही प्रवाशांस विनामुल्य देण्यात येईल.
iii) सदर संधी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसना लागू राहील.
iv) सदर संधी महामंडळाने आगाऊ आरक्षणासाठी वेळोवेळी विहीत केलेल्या मुदतीतच घेता येईल. (उदा. आगाऊ आरक्षणाची मुदत सद्या 15 दिवस आहे. या मुदती नंतरच्या तारखेस प्रवासी सदर संधी घेऊ इच्छित असेल तर ती मिळणार नाही.)
v) सदर संधी ही एकच वेळ वापरता येईल.
vi) सदर संधी बस सुटण्याच्या ठिकाणाहूनच मिळेल.
vii) सदर संधी घेतल्यामुळे साध्या गाडीच्या प्रवाशाला सेमी-लक्झरी अथवा उच्च श्रेणीच्या बसमध्ये प्रवास करणे भाग पडत असेल, तर साध्या गाडीच्या व उच्च श्रेणी गाडीच्या प्रवासभाडयातील फरक नियमाप्रमाणे प्रवाशाकडून वसूल करण्यांत येईल.
viii) सदर संधी घेतल्यामुळे सेमी-लक्झरी अथवा उच्च श्रेणीच्या बसच्या प्रवाशास साध्या गाडीतून प्रवास करणे भाग पडत असेल, तर साध्या गाडीच्या व उच्च श्रेणी गाडीच्या प्रवासभाडयातील फरकाचा परतावा नियमाप्रमाणे प्रवाशास देण्यांत येईल.
ix) प्रवाशांच्या संख्येमध्ये प्रवाशांस बदल करता येईल व त्याप्रमाणे त्याच्याकडून प्रवासभाडयाचा फरक वसूल करण्यांत येईल. मात्र प्रौढाबद्दल मुल व मुलाबद्दल प्रौढ असा बदल करता येणार नाही.
x) सदर संधी घेतल्यामुळे Partial or Full Cancellation नियमानुसार करता येईल.
xi) प्रवाशांस गंतव्य स्थान बदलता येणार नाही.
xii) सदर संधी घेणारा प्रवासी सिट नसल्यामुळे उभ्याने प्रवास करण्यास तयार असल्यास त्याला आरक्षण आकार परत मिळणार नाही.
xiii) प्रवास तारीख बदल संधीच्या बाबतीत स्थानक प्रमुख प्रवाशाला नविन तिकीट देतील. त्यावर स्थानक प्रमुख ’प्रवास बदल संधी तिकीट ’ असा उल्लेख करतील. वाहक गाडीमध्ये मार्गपत्रकावर तसेच WBR वर सदर तिकीटाच्या सर्व नोंदी घेतील.
xiv) एखादया प्रवाशास जर दुस-या विभागाच्या गाडीत प्रवास बदल संधी दिली असल्यास ज्या आगाराचे मुळ तिकीट आहे त्याच्या विभागाने दुस-या विभागास उत्पन्न वर्ग करुन देण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती महिनाअखेर कळवून उत्पन्न वळते करुन घ्यावे.
xv) प्रवास बदल संधी तिकीट रद्द करावयाचे असल्यास महामंडळाच्या नियमाप्रमाणे परतावा दिला जाईल.

अ-III) इतर सुचना :
i) प्रवास तारीख बदल संधीच्या बाबतीत स्थानक प्रमुख प्रवाशाला नविन तिकीट देतील. त्यावर स्थानक प्रमुख ’प्रवास बदल संधी तिकीट ’ असा उल्लेख करतील. वाहक गाडीमध्ये मार्गपत्रकावर तसेच WBR वर सदर तिकीटाच्या सर्व नोंदी घेतील.
ii) आगार व्यवस्थापकांनी परिशिष्ट ’अ’ मध्ये दिलेल्या नमुन्यात रजिस्टर ठेवावे.
iii) आगार लेखाकार व स्थानक प्रमुखांनी परिशिष्ट ’अ’ मध्ये ठेवलेले रजिस्टर रोजच्या रोज तपासणी करावयाची आहे.
iv) वित्तिय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी याबाबत लेखा खात्याचे विस्तृत परिपत्रक (ADC) प्रसारीत करतील.

परिशिष्ट ’अ’ प्रवास तारीख बदल संधी घेतलेल्या प्रवाशांचे विवरण पत्र

                           आगार :                                                                           तारीख :

भाग-1- प्रवास तारीख बदल संधी मागणी करणा-या प्रवाशाच्या जुन्या तिकीटाची माहिती
अ.क्र. तपशील  
1 प्रवाशाचे नांव  
2 प्रवासाची तारीख  
3 प्रवासाचा मार्ग  
4 गाडी सुटण्याची वेळ  
5 सेवाप्रकार  
6 आसन क्रमांक  
7 आगाऊ आरक्षण तिकीट क्र.  
8 आगाऊ आरक्षणाची तारीख  
9 आगाऊ आरक्षण तारखेची वेळ  
10 आगाऊ आरक्षणाची रक्कम  
11 प्रौढांची संख्या  
12 मुलांची संख्या  
भाग-2- प्रवास तारीख बदल संधी तिकीटाची माहिती
1 प्रवास तारीख बदल संधी मागणी केलेल्या अर्जाची तारीख व वेळ  
2 प्रवास तारीख बदलुन मागीतलेली नविन तारीख  
3 नविन प्रवासाचा सेवाप्रकार  
4 नविन प्रवासाची गाडी सुटण्याची वेळ  
5 नविन प्रवासाची आसनसंख्या  
6 प्रौढांची संख्या  
7 मुलांची संख्या  
8 प्रवास बदल संधी तिकीटाचा क्रमांक  
9 प्रवासभाडयाची रक्कम  
10 प्रवासभाडे रक्कम  
11 तिकीट अशंत: रद्द (Partial Cancellation) केलेले असल्यास व्यक्तींची संख्या (प्रौढ + मुले)  
12 अशंत: रद्द केलेल्या तिकीटाची रक्कम (रु.)  
13 नविन सेवाप्रकारामुळे प्रवासीभाडयाच्या रकमेचा फरक वसुल केला असल्यास फरकाची रक्कम (रु.)  
14 नविन सेवाप्रकारामुळे प्रवाशास परतावा दिला असल्यास परताव्याची रक्कम रक्कम (रु.)  
15 प्रवासी उभ्याने प्रवास करीत होता काय ?  


     आगार लेखाकार                                                       स्थानकप्रमुख                                                    आगार व्यवस्थापक


v) विभाग नियंत्रक, विभागीय लेखाधिकारी व विभा.वाह.अधिकारी तसेच विभागातील इतर तपासणी अधिका-यांनी आगार भेटीच्या वेळी सदर रजिस्टर तपासावे.
vi) प्रादेशिक कार्यालयातील अधिका-यांनी आगार भेटीच्या वेळी सदर रजिस्टर तपासावे.
vii) प्रादेशिक व्यवस्थापकांनी खालील नमुन्यात विभागनिहाय विवरणपत्र महाव्यवस्थापक यांना दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवावे.

प्रवास बदल संधी तिकीट - विभाग निहाय विवरणपत्र

           प्रदेश :                                                                      महिना :

अ.क्र. तपशील विभाग विभाग विभाग एकुण
1 प्रवास बदल संधी तिकीट घेतलेल्या प्रवाशांची संख्या(प्रौढ + मुले)        
2 प्रवास बदल संधी तिकीट घेतलेल्या प्रवाशांमुळे महामंडळास मिळालेले उत्पन्न (रु.)        

(सदर सामान्य स्थायी आदेशाची अंमलबजावणी दि. 1/4/2008 पासुन करण्यात यावी.)

                                                                                             उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक.
 

 
 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.