msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
वाहतूक : अपघात टाळण्यासाठी प्रोत्साहन बक्षिस योजना

             

अपघात टाळण्यासाठी प्रोत्साहन बक्षिस योजना
१) आगारात काम करणा-या कर्मचा-यांना कार्यक्षमतेच्या दृष्टीने प्रोत्सहन मिळावे म्हणून सलग ६ महिन्याच्या अपघात विरहीत कालावधीसाठी आगाराच्या कामगिरीबद्दल रुपये २,५००/- चे पारितोषिक देण्याची योजना कार्यान्वित आहे.

२) जे चालक सतत २६० दिवस विना अपघात सेवा एक वर्षाच्या कालावधीत पूर्ण करतील अशा चालकांना रुपये ५००/- चे पारितोषिक तर जे चालक सतत २६० दिवस विना अपघात सेवा एक वर्षापेक्षा जास्त परंतू दोन वर्षाच्या आत पूर्ण करतील अशा चालकांना रुपये ३००/- चे पारितोषिक देण्याची योजना कार्यन्वित आहे.

३) चालकांना निवड श्रेणी देतांना अपघात विरहीत ५ वर्षाचा काळ असणे ही एक अट ठेवली आहे.

४) ज्या चालकांनी ५ वर्षे, १० वर्षे, १५ वर्षे, २० वर्षे, २५ वर्षे आणि ३० वर्षे अशी अपघात विरहीत सेवा केली असेल अशा चालकांना सुरक्षित वाहन चालविण्या बद्दलचा बिल्ला देण्यात येतो.

५) मेसर्स हिंदूस्तान फेरोडो लिमिटेड या कंपनीने अपघात सुरक्षिततेच्या कार्याबद्दल महामंडळाच्या कर्मचा-यांना बक्षित देऊ केलीत. या बक्षिस योजनेस महामंडळाने मान्याता दिल्यांनतर सन १९८५-८६ वर्षाचा बक्षित समारंभ दिनांक २/५/१९८७ रोजी आयोजित केला होता. तसेच सन १९८६-८७ व १९८७-८८ वर्षात बक्षिस समारंभ दिनांक २३/६/१९८८ रोजी आयोजित केला होता. या योजनेत खालील बक्षिसांचा समावेश होता.

  अ) महामंडळात असणा-या विभागापैकी ज्या दोन विभागांचे काम सुरक्षित प्रवासी वाहतूक करणारे म्हणून अधिक कार्यक्षम व चांगले ठरेल त्या विभागांना फेरोडो फिरती ढाल.
  ब) महामंडळाअंतर्गत असणा-या आगारांपैकी ज्या पांच आगारांचे काम सुरक्षित प्रवासी वाहतूक करणारे म्हणून अधिक कार्यक्षम व चांगले ठरेल त्या आगारांना फिरत्या ढालीची कायमस्वरूपी प्रतिकृती.
  क) अपघात विरहित सेवेबद्दल ६० चालकांना रोख बक्षिस, स्मृती चिन्ह व प्रशस्तीपत्रक व या चालकाच्या धर्मपत्नीचा गौरव.

६) रस्ते वाहतूक सुरक्षितता करंडक
    देशातील निरनिराळया राज्यातील राज्यमार्ग परिवहन महामंडळे, कंपन्या, शहरी वाहतूक करणारे उपक्रम, शासकिय खाते यांची राष्ट्रीय पातळीवर संघटना (ए.एस.आर.टी.यु) नवी दिल्ली येथे आहे. या संघटनेत एकूण ७० सभासद आहेत. प्रवासी वाहतूक क्षेत्रात निरनिराळ्या चांगल्या कामकाजाबाबत सभासद उपक्रमांना ही संघटना दरवर्षी बक्षिसे / करंडक प्रदान करते.
    म.रा.मा.प. महामंडळाचे अपघातांचे दर लाख कि.मी. मागे प्रमाण सन १९९२-९३ साली कमीत कमी असल्याने या वर्षाचा ‘‘रस्तेवाहतूक सुरक्षितता करंडक’’ म.रा.मा.प महमंडळाला मिळाला होता. दिनांक ३०/३/१९९४ रोजी श्री. सी.एन. रामदास, भा.प्र.से, अध्यक्ष, राज्य मार्ग परिवहन उपक्रम संघटना तथा सचिव, भूतल परिवहन मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या हस्ते ‘‘रस्ते वाहतूक सुरक्षितता करंडक’’ म.रा.मा.प महामंडळास प्रदान करण्यात आला.

७) म.रा.मा.प महमंडळात २० वर्षे किंवा त्यापेक्षा ज्यास्त वर्षे अपघात विरहीत सेवा करणा-या ७२० चालकांचा दिनांक ३०/११/१९९५ रोजी विशेष गौरव समारंभ आयोजित करून मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

८) अपघात विरहीत सेवा करणा-या चालकांचा विशेष गौरव करण्याबाबत महामंडळ संचालकांनी निर्णय घेतला होता. त्यानुसार चालकांचा विशेष गौरव समारंभ दिनांक ५/६/१९९८ रोजी तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला. या सत्कार समारंभास मा. अध्यक्ष, मा. उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, मा. संचालक, म.रा.मा.प महामंडळ, अधिकारी वर्ग व कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता. या विशेष गौरव समारंभाच्या ठळक बाबी पुढील प्रमाणे.

  अ) ३० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त
वर्षे अपघात विरहीत सेवा झाली, अशा एकूण ७५ चालकांचा मा. अध्यक्षांच्या हस्ते रोख रुपये १५,०००/- चे बक्षिस, सन्मानपत्र व या चालकांच्या धर्मपत्नीची साडी-खण देऊन गौरव करण्यात आला.
  ब) २५ वर्षा पेक्षा जास्त परंतु ३० वर्षाच्या आत अपघात विरहीत सेवा झाली, अशा एकूण ३९४ चालकांचा मा. अध्यक्षांच्या हस्ते
सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

९) ज्या चालकांची महामंडळात ३० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे अपघात विरहीत सेवा झाली असेल चालकांचा विशेष गौरव करण्याबाबत महामंडळ संचालकांनी निर्णय घेतलेला आहे. दिनांक ०७.०१.२००३ रोजी पुणे येथे चालकांना विशेष गौरव समारंभ संपन्न झाला. या समारंभात ५९ चालकांना प्रत्येकी रुपये १५,०००/- चे रोख बक्षिस, सन्मानपत्र व या चालकांच्या धर्मपत्नीचा साडी-खण देऊन गौरव करण्यात आला.

१०) २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे अपघात विरहीत सेवा केलेल्या रा.प. चालकांचा विशेष गौरव करण्याबाबत महामंडळाने सुधारित निर्णय घेतला. ३० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे अपघात विरहीत सेवा केलेल्या एकूण ३२ चालकांचा व २५ वर्षे किंवा त्यापेक्षा ज्यास्त वर्शे परंतु ३० वर्षाच्या आत अपघात विरहीत सेवा केलेल्या ३३५ चालकांचा विशेष गौरव समारंभ दिनांक ७/१/२००४ रोजी अहमदनगर येथे संपन्न झाला. या समारंभात ३० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे अपघात विरहीत सेवा केलेल्या ३२ चालकांना रुपये १५,०००/- चे रोख बक्षिस, सन्मानपत्र व २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे परंतु ३० वर्षाच्या आत अपघात विरहित सेवा केलेल्या ३३५ चालकांना प्रत्येकी रुपये ७,०००/- चे बक्षिस, सन्मानपत्र व या चालकांच्या धर्मपत्नीचा साडी-खण देऊन विशेष गौरव करण्यात आला.

११) २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे अपघात विरहीत सेवा केलेल्या २७५ चालकांचा विशेष गौरव समारंभ दिनांक ९/१/२००५ रोजी औरंगाबाद येथे संपन्न झाला. या समारंभात २५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षे अपघात विरहीत सेवा केलेल्या एकूण २७५ चालकांना प्रत्येकी रुपये ७,०००/- चे बक्षिस, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व या चालकांच्या धर्मपत्नीचा साडी-खण देऊन विशेष गौरव करण्यात आला.

    वर उल्लेख केलेल्या अनेक अपघात प्रतिबंध योजना अमलात आणल्या जात आहेत. तसेच वरील विवरणावरुन असे दिसून येईल की, अपघातांमुळे होणा-या गंभीर परिणामांची जाणीव महामंडळाला पुर्णपणे आहे. अपघात टाळण्याच्या दृष्टीने महामंडळ सर्व तोपरी व सतत प्रयत्न करीत आहे.

 
 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.