msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
प्रवासी वाढवा विशेष अभियान २००७ बक्षिस समारंभ.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
मध्यवर्ती कार्यालय, महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मुंबई ४००००८
दूरध्वनी क्र. २३०२३९००                           फॅक्स क्र. २३०७५५३९
_________________________________________________________________________________________

प्रसिद्धी पत्रक क्र. २६
‘प्रवासी वाढवा विशेष अभियाना’ त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या
एस. टी. वाहक, आगार व विभागांचा विशेष बक्षिस समारंभ

---------------

मुंबई, बुधवार दि. १९ डिसेंबर, २००७.
      एस. टी. महामंडळाची प्रवासी सेवा अधिक लोकाभिमुख करुन प्रवाशांना एस.टी. सेवांकडे आकृष्ट करण्यासाठी मा. अध्यक्ष, आमदार श्री. सुधाकरपंत परिचारक यांच्या सूचनेनुसार दि. १ जानेवारी ते ३१ मार्च, २००७ या कालावधीत एस.टी. महामंडळाने ‘प्रवासी वाढवा विशेष अभियान’ राबविले होते. या तीन महिन्याच्या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ८४ वाहक, ५३ आगार व १५ विभागांचा विशेष बक्षीस समारंभ शनिवार दि. २२ डिसेंबर, २००७ रोजी दु. ३.०० वा पुणे येथील आचार्य अत्रे सभागृह, संत तुकाराम नगर, चिंचवड, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.

      सदर बक्षिस वितरण समारंभ मा. नामदार श्री. अजितदादा पवार, जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ वगळून) लाभक्षेत्र विकास, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शुभहस्ते, मा. ना. श्री. जयंतराव पाटील, वित्त आणि नियोजन मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. आ. श्री सुधाकरपंत परिचारक, अध्यक्ष, म. रा. मा. प. महामंडळ आणि मा. श्री. रमानाथ झा, भा. प्र. से., प्रधान सचिव (परिवहन व राज्य उत्पादन शुल्क) महाराष्ट्र शासन यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न होणार आहे.
      एस.टी. महामंडळाने राबविलेल्या या 'प्रवासी वाढवा विशेष अभियानात' महामंडळाचे उत्पन्न मागील वार्षाच्या तुलनेत रु. ६० कोटींनी वाढले असून महामंडळाच्या प्रवासी संख्येत सुमारे ३ कोटींनी वाढ झाली होती. या अभियानात प्रवाशांना एस.टी. सेवांकडे आकृष्ट करण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाहकांचा गौरव करण्याचा निर्णय महामंडलाने घेतला होता. त्यानुसार विविध आगारातील ज्या ८४ वाहकांचा प्रत्येकी रु. १०००/- चे रोख बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.
      या अभियाना अंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रत्येक प्रदेशातील तीन आगारांना व एक विभागास रोख बक्षीस देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या अंतर्गत प्रथम क्रमांकावरील आगाराला रु. ५०,०००/- आणि द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या आगारांना अनुक्रमे रु. २५,०००/- व रु. १५,०००/- चे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. तसेच प्रथम क्रमांकावरील विभागाला रु. २५,०००/- चे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.

      जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च २००७ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विभाग व आगारांची प्रदेश निहार माहिती खालीलप्रमाणे आहे.

जानेवारी २००७

क्र. प्रदेश सर्वोत्कृष्ट विभाग             सर्वोत्कृष्ट आगार
  प्रथम द्वितीय तृतीय
. औरंगाबाद परभणी परांडा औरंगाबाद-१ पाथरी
अमरावती -- नेर परतवाडा राळेगांव
नागपूर चंद्रपूर गडचिरोल चंद्रपूर उमरेड
नाशिक जळगांव कोपरगांव साक्री जळगांव
मुंबई  रत्नागिर देवरुख सावंतवाड चिपळूण
पुणे सोलापूर अक्कलकोट पंढरपूर सातारा

फेब्रुवारी २००७

क्र. प्रदेश सर्वोत्कृष्ट विभाग             सर्वोत्कृष्ट आगार
  प्रथम द्वितीय तृतीय
. औरंगाबाद परभणी परांडा बसमत परभणी
अमरावती -- राळेगांव जळगांव-जामोद अमरावती-१
नागपूर वर्धा  वरोर पुलगांव नागपूर-२
नाशिक नाशिक पिंपळगांव कोपरगांव तारकपूर
मुंबई रत्नागिरी अलिबाग परळ मुरुड
पुणे -- इंदापूर वाई --

मार्च २००७

क्र. प्रदेश सर्वोत्कृष्ट विभाग             सर्वोत्कृष्ट आगार
  प्रथम द्वितीय तृतीय
. औरंगाबाद बीड परांडा हदगांव माजलगांव
अमरावती अमरावती नेर पांढरकवड उमरखेड
नागपूर वर्धा अहेरी तळेगांव नागपूर-२
नाशिक नाशिक पिंपळगांव कोपरगांव कळवण
मुंबई रत्नागिरी अलिबाग रत्नागिरी अलिबाग
पुणे पुणे नेरगांव वाई राजगुरुनगर


 

 
 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.