msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
 

Citizen's Charter: Chapter-8

प्रकरण-8

सवलत

समाजातील विविध सामाजिक घटकांना सामाजिक न्याय देण्याच्याहेतूने, तसेच सामाजिक बांधिलकीच्या नात्याने व विविध सामाजिक घटकांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा यथोचित सन्मान व्हावा या हेतूने, त्याचप्रमाणे शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी, अंध, अंपग या सामाजिक घटकांना अल्प दरात प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी व त्यांना शैक्षणिक व इतर विकासांच्या संधींपासून मुकावे लागू नये या सामाजिक बांधिलकीच्या हेतूने समाजातील विविध घटकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमधून प्रवासासाठी प्रवासभाडे सवलत योजना सुरु करण्यांत आलेल्या आहेत. या योजनांमुळे अल्प उत्पन्नगटातील विद्यार्थ्यांनासुध्दा शिक्षण घेणे शक्य झाले असून या योजनांमुळे राज्याच्या सर्वांगिण विकासास हातभार लागत आहे.  या प्रवासभाडे सवलत योजनांचा तपशील ''परिशिष्ट अ'' अन्वये देण्यांत येत आह, तर या योजनेंची कार्यपध्द्ती, नियम, अटी-शर्ती व योजनेत सहभागी होण्यासाठी करावयाची पूर्तता इत्यादि तपशील ''परिशिष्ट ब'' मध्ये देण्यांत येत आहे.

परिशिष्ट   अ

रा.प. बसेसमधून समाजातील विविध घटकांना देण्यांत येत असलेल्या प्रवास भाडे सवलत योजना

अ.क्र.

सवलतीचा तपशील

सवलत अनुज्ञेय  बस सेवा प्रकार

प्रवास भाडयातील सवलत टक्केवारी

1

स्वातंत्र्य सैनिक व त्याचे सोबत एक साथीदार यांना वर्षभर मोफत प्रवास

साधी, निमआराम, आराम

100 %

2

डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार प्राप्त व्यक्ती व तीचा साथीदार .

साधी, निमआराम, आराम

100 %

3

अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इयत्ता 5 वी ते 10 शिक्षण घेणा-या ग्रामीण भागांतील विद्यार्थिनी.   

साधी, निमआराम

100 %

4

शासनाधिकृत पत्रकार 8,000 कि.मी.पर्यंतच्या साधी बस प्रवास भाडे मुल्या इतके एका आर्थिक वर्षासाठी सिमीत 

साधी, निमआराम

100 %

5

माजी विधान मंडळ सदस्य व त्यांचे विवाह साथी यांना सवलत 

साधी, निमआराम, आराम, वातानुकुलित

100 %

6

आजी विधानंडळ सदस्य व एक सहप्रवासी यांना प्रवासाची सवलत.

साधी, निमआराम, आराम, वातानुकुलित

100 %

7

राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक

साधी

50 %

8

विद्यार्थी मासिक पास सवलत

साधी

66.66 %

9

विद्यार्थ्याेंना मोठया सुट्टीत मुळगांवी जाणे-येणेसाठी, परिक्षेला/ कॅम्पला/आजारी आई वडिलांस भेटण्यास जाणे-येणेसाठी सवलत

साधी

50 %

10

विद्यार्थ्यांसाठी नैमित्तीक करारावर बसेसमध्ये सवलत

साधी

50%

11

अंध विद्यार्थी व व्यक्ती त्यांचे मदतनिस (Escort)

साधी

75 %  50 % (मदतनीस)

12

क्षय रोगी वैद्यकीय उपचारासाठी

साधी

50 %

13

क रोगी वैद्यकीय उपचारासाठी

साधी

50 %

14

कुष्ठरोगी वैद्यकीय उपचारासाठी

साधी

75 %

15

शारिरिकदृष्टया अपंग व्यक्ती व त्यांचे मदतनिस (Escort)

साधी

75 %   50 % (मदतनीस)

16

राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या खेळांमध्ये भाग घेतलेल्या विजेत्या स्पर्धकांसाठी

साधी

33.34 %

17

रेस्क्ंयु होम मधील मुलांना वर्षातुन एकदा सहली करीता

साधी

66.66 %

18

मुंबई पुर्नवसन केद्रातील मानसीकदृष्टया अपंग विद्यार्थ्यांचे सहलीसाठी

साधी

66.66 %

19

विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबे

साधी

100 %

20

अर्जुन व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त क्रिडापटु वार्षीक मर्यादा रु.500/-

साधी, निमआराम, आराम

100 %

21

आदिवासी पुरस्कार प्राप्त व्यक्ती आणि त्याची पत्नी अथवा वर्षभर विनामुल्य प्रवास

साधी, निमआराम, आराम

100 %

22

पंढरपुर आषाढी/कार्तीक एकादशीस शासकिय पुजेचा मान मिळालेल्या वारकरी दांम्पत्यास वार्षिक मर्यादा रु.9000/-

साधी, निमआराम

100 %

23

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार्थी व एक साथीदार यांना वर्षभर विनामूल्य प्रवास सवलत.

साधी, निमआराम, आराम

100%

 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.